व्हॉइस ऑफ मीडिया यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी प्रतिभा तातेड यांची नियुक्ती

व्हॉइस ऑफ मीडिया यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी प्रतिभा तातेड यांची नियुक्ती
उमरखेड :
देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना म्हणून नावारूपास आलेली व्हॉइस ऑफ मीडिया अल्पावधीतच देशाबाहेरही पोहोचली आहे. या संघटनेच्या अंतर्गत महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र विंगची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये प्रतिभा तातेड यांची यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
व्हॉइस ऑफ मीडिया हे महिला पत्रकारांसाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. ग्रामीण व शहरी भागातील तळागाळातील महिला पत्रकार या संघटनेमध्ये सामील होऊन पत्रकारांसाठीच्या पंचसूत्री मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत.
या वेळी प्रतिभा तातेड म्हणाल्या, “पत्रकारिता क्षेत्रामध्ये महिला संख्या खूपच कमी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महिला पत्रकारांनी या संघटनेमध्ये सहभागी व्हावे. ही संघटना केवळ महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र विंग असलेली असून, त्यांच्या न्यायहक्कांसाठी लढणारी आहे.”
यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रतिभा तातेड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
या निवडीसाठी संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष सविता चंद्रे आणि रश्मी मारवाडी यांचे मार्गदर्शन लाभले.
hentaifox I really like reading through a post that can make men and women think. Also, thank you for allowing me to comment!