प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातर्फे शिवजयंती साजरी

youtube

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ तर्फे शिवजयंती साजरी.

ढाणकी प्रतिनिधी –
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातर्फे ढाणकी येथे उत्साहात पार पडली.
नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत, सामान्य नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या बेधडक पणे शासन दरबारीं मारणारी सामान्य जनतेची, पत्रकारांची संघटना म्हणून या संघटनेला आज पाहिल्या जात आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री डी टी आंबेगावे यांच्या मार्गदर्शनात ही संघटना उत्कृष्ट पणे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कार्य करत आहे आज च्या पावन मुहूर्तावर पाऊस सुरु असताना सुद्धा संघटनेच्या सदस्यांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
यावेळी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष, धनगर समाज युवती प्रदेश अध्यक्ष, पत्रकार सविता चंद्रे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड, कोशाध्यक्ष गजानन गंजेवाड, उमरखेड तालुका अध्यक्ष उदय पुंडे, सरचिटणीस मोहन कळमकर, व सदस्य उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!