गुरु हा बुद्धा सारखा असावा – डॉ अनिल काळबांडे.
गुरु हा बुद्धा सारखा असावा – डॉ अनिल काळबांडे
उमरखेड :
अंधारातून प्रकाशाकडे , अज्ञानातून ज्ञानाकडे , अनैतिकते कडून नैतिकते कडे, अंगुलीमाल डाकू कडून भिक्षू अंगुलीमाला कडे , चंड सम्राट अशोका कडून देवानि प्रिय सम्राट अशोका कडे नेणारा गुरु हा बुद्धा सारखा असावा असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक डॉ अनिल काळबांडे यांनी केले ते तालुक्यातील बेलखेड या गावी सत्यसाई सेवा सामितिच्या वतीने आयोजीत माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून आयोजीत कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ वि .ना . कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी शिक्षण अधिकारी नारायण वड्डे , माजी मुख्याध्यापक परमेश्वर मामीडवार, केंद्रप्रमुख सुरेश वाघ , सरपंच चंद्रकला कदम , ग्रा पं सदस्य ताईबाई राठोड उपस्थीत होते . या वेळी आदर्श शिक्षक म्हणून व्ही बी . तावडे, माधव गुटे, मुख्याध्यापक एस ए पाटील , बी जी . शेवटे मॅडम यांचा श्रीफळ शाल व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला . या वेळी नारायण वड्डे , सुरेश वाघ , परमेश्वर मामीडवार यांनी शिक्षणातून होणारा विकास, आधुनिक मूल्य यावर मार्गदर्शन केले . डॉ काळबांडे यांनी , एकलव्य , ‘ डाकू अंगुलीमाल , राष्ट्रमाता जिजाऊ , डॉ बाबासाहेब यांच्या उदाहरणातून आदर्श गुरु कसा असावा या वर सविस्तर मार्गदर्शन केले तर डॉ कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून, शिक्षण घेतांना गुरुचे , शिक्षकाचे महत्व कसे असते यावर उदाहरण देऊन सविस्तर मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन सेवा निवृत्त जेष्ठ मुख्याध्यापक तथा सत्यसाई सेवा समितिचे धोंडूपंत वाघ यांनी केले सुत्रसंचालन जर्नादन सुर्यवंशी यांनी केले तर आभार विकास डोळस यांनी मानले (सोबत फोटो )