स्वातंत्र्य महोत्सवी अमृत महोत्सवी दिनानिमित्त – सरपंच राजश्रीताई भोसीकर राजर्षी शाहू आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
स्वातंत्र्य महोत्सवी अमृत महोत्सवी दिनानिमित्त #
सरपंच राजश्रीताई भोसीकर राजर्षी शाहू आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
लोहा,(प्रतिनिधी)
ग्रामपंचायत कार्यालय पानभोसीच्या महिला सरपंच राजश्रीताई मनोहरराव भोसीकर यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अतिशय प्रतिष्ठेचा व मानाचा समजला जाणारा यंदाचा २०२३ चा दिला जाणारा राजर्षी शाहू आदर्श सरपंच पुरस्काराने पुणे येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य महोत्सवी वर्षानिमित्त पुणे येथे राजर्षी शाहू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व दक्ष मराठी पत्रकार संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा राजर्षी शाहूसमाजभुषण आदर्श सरपंच पुरस्कार -२०२३ हा मा.सौ.राजश्रीताई मनोहरराव भोसीकर यांना वितरीत करण्यात आला.सदरिल पुरस्कार महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सौ.भोसीकर यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे करण्यात आली.तसेच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.गावासह तालुका, जिल्हा, राज्यासह,देशाच्या विविध विकासात दिलेल्या योगदानाची दखल घेतली गेली.तसेच हातभार लावला.कोरोना काळात जिवाची बाजी लावून भरभरून कामे केली, लसीकरण १०० टक्के लसीकरण यशस्वी करणे,हरघर तिरंगा , महिला सबलीकरण, जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम राबविल्या बद्दल पानभोसीच्या आदर्श सरपंच सौ.राजश्रीताई मनोहरराव भोसीकर यांना अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर , जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक मनोहर पाटील भोसीकर,दक्ष मराठी पत्रकार पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव श्रीमंदीलकर, महाराष्ट्रातील सरपंच आदींची उपस्थिती होती. सदरील प्रतिष्ठेचा व मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे लोहा-कंधार तालुक्यातून शुभेच्छांचा मोठा वर्षाव होत आहे.