कोविडच्या सर्व नियम पाळून श्री ची स्थापना करावी ठाणेदार – राजीव हाके.
कोविडच्या सर्व नियम पाळून श्रीं ची स्थापना करावी -ठाणेदार राजीव हाके.
मुळावा येथे शांतता समितीची बैठक संपन्न
मुळावा प्रतिनिधी –
मुळावा येथे गणेशोत्सव निमित्य ठाणेदार राजीव हाके यांच्या मार्गदर्शनात शांतता कमिटी व गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली कोवीडचे सर्व नियम पाळून तसेच शासनाकडून ऑनलाईन परवानगी घेऊन श्रीं ची स्थापना करावी अशी माहिती पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके यांनी दिली तसेच लाॅउडस्पिकर व मिरवणूक यावर प्रतिबंध असून चार फूटा पेक्षा जास्त उंचीची मुर्ती असू नये तसेच आरती साठी छोट्या स्पीकर बॉक्सचा उपयोग करावा, ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे शासनाचे निर्देश आहेत असे सांगीतले
यावेळी पोलीस प्रशाषणाकडून उत्सवानिमित्य सहकार्याची भुमिका राहील तसेच गावकऱ्यांनी सुद्धा गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा, उत्सवादरम्यान कोणताही अनुचितप्रकार घडणार नाही यासाठी तगडा बंदोबस्त राहील असे ठाणेदार हाके यांनी सभेला संबोधित करताना सांगितले तर यावेळी मंडळ पदाधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांनी उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याची व उत्सव गुण्यागोविंदाने साजरा करण्याची ग्वाही गावकऱ्यांनी दिली यावेळी रामराव जामकर , दिनेश चौतमाल, भगवानराव चव्हाण , संजय रावते, पोलीस पाटील शंकर बरडे, यांनी काही समस्या मांडल्या कार्यक्रमास राजेश पंडीत सहायक फौजदार, इंगोले काका, नाना मस्के बिट जमादार, अमोल कान्हेकर, राहूल मडावी इत्यादी पोलीस कर्मचारी तर
रामभाऊ पाठक , गजानन पवार, विश्वनाथ कानडे, अजित पाध्ये, अविनाश आसोले, राजेश जकात, सुरज वाडेकर, गजानन पडघणकर, गफ्फार भाई इत्यादी ग्रामस्थ तसेच आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते