मोदी साहेबाचा “विकसित भारत संकल्प यात्रेचा संकल्प-रामदास पाटील सुमठाणकर
मोदी साहेबाचा “विकसित भारत संकल्प यात्रेचा संकल्प-रामदास पाटील सुमठाणकर
उमरखेड –
हिंगोली विधानसभा क्षेत्रातील आडगाव मुटकुळे या गावी “विकसित भारत संकल्प यात्रा” दाखल झाली होती. या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकार आपल्या दारी आले असल्याचे सांगून या माध्यमातून आयुष्मान भारत,प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना,
दीनदयाल अंत्योदय योजना, प्रधान मंत्री आवास योजना,प्रधानमंत्री उज्ज्वला योजना;प्रधानमंत्री
विश्वकर्मा; प्रधानमंत्री किसान सम्मान; किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान; जन धन योजना; अटल पेंशन योजना
स्त्रियांसाठी धूरमुक्त स्वयंपाक उज्वल्ला गॅस योजना इत्यादी या योजनाचा प्रसार व प्रचार करणे त्यांची माहिती समाजातील शेवटच्या माणसाला देणे हा मुळ उद्देश असल्याचे रामदास पाटील सुमठाणकर म्हणाले.
यावेळी पूर्व संघटन मंत्री भाऊराव जी देशमुख, मा आ तानाजीराव मुटकुळे,भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी मामा शिंदे, मा बाबारावजी बांगर साहेब, मा.के.के शिंदे साहेब, नारायणराव खेडकर मामा,मा तहसीलदार वगवाड साहेब, मा गटविकास अधिकारी बोथिकर साहेब, मा डॉ.कोरडे साहेब, सतीश दादा खाडे, सभापती हरीशचंद्र शिंदे मामा, कैलास सेठ काबरा, गोल्डी सेठ,हमीद भाई, रजनीताई पाटील, शैलेश जैस्वाल, सरपंच ज्ञानोबा मुटकुळे, कार्यकारी अभियंता दाणे साहेब, पाटील साहेब, ग्रामसेवक, तलाटी, तसेच हमीद भाई प्यारेवाले,संतोष भाऊ टेकाळे, अमोल तिडके, adv अमोल जी जाधव, मंडळ अध्यक्ष माणिक लोढे, हिंमत राठोड,कांतराव घोंगडे,मनोज शर्मा आणि गावातील लाभार्थी, परिसरातील सरपंच उपस्तित होते
15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ही यात्रा संबध भारत भर चालणार असल्याचे सांगून, जननायक बिरसा मुंडा जयंती दिवशी सुरु झालेल्या या यात्रेतून विविध केंद्रीय आणि राज्य योजनांची माहिती समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे,हे यात्रेचे उद्दिष्ट असल्याचे मोदी सरकारचे धोरण आहे असेही म्हणाले. आणि ह्या योजनाची माहिती प्रशासनाने काळजीपूर्वक पोहचवावि असेही मत मांडले.
विकसित भारत यात्रा यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे असे सांगून योग्य लाभार्थी योजनांचा लाभ घेतील तरच विकसित भारत संकल्पयात्रा खर्या अर्थाने यशस्वी होईल.आज भारताचा तरुण मेहनत करून नवा भारत उभा करण्यासाठी मदत करत आहे ही बाब देशासाठी फार गौरवाची म्हणावी लागेल.
आज घडीला मोदी सरकार कडून शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातआहेत.शेतकरी,कामगार,महिला तसेच युवा वर्गाच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना सरकार राबवत आहे.
अंत्योदय म्हणजेच शेवटच्या माणसाचा उदय करणे हे सरकारचे ब्रीद आहे आणि त्याचं प्रमाणे सरकार वाटचाल करत असल्याचं आपण सर्वजण बघत आहोत.
मोदीजी एकाही दिवसाची सुट्टी न घेता देश सेवेस वाहून घेतलेले नेतृत्व आहेत.आपणही मतदार म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने त्यांना देश सेवा करण्यास अजून ऊर्जा मिळते हे या निमित्ताने मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो असे बोलले. 2014 आणि 2019 ला मतदान रुपी आपण दिलेले देशासाठी योगदान हे काही कमी नसून 2024 ला मोदीजीं यांचे हात बळकट करायचे आहेत .
ही यात्रा आता महाजन आंदोलन बनली आहे.या गाडीला “मोदी की गॅरंटी वाली गाडी” अशी उपमा मतदारांनी दिली आहे.
युवा पिढी तर विकसित भारताचे ब्रँड ॲम्बेसेडर बनले आहेत.सरकारी योजनांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनमानात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असल्याने मोठ्या प्रमाणात सामान्य माणूस मोदी सोबत असल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
Which one of these crime preventing women are you?
Hi! Do you know if they make any plugins to help with Search
Engine Optimization? I’m trying to get my website to rank for some targeted keywords
but I’m not seeing very good success. If you know
of any please share. Thanks! You can read similar article here:
Eco blankets