सहा वर्षाच्या मदियाने ठेवला रोजा.
सहा वर्षाच्या मदियाने ठेवला रोजा
उमरखेड —
दि.13 मे
मुस्लिम बांधवांचा पवित्र असलेल्या रमजान महिना सध्या चालू आहे.रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा म्हणजे उपवास ठेवतात.मुस्लिम धर्मात रोजा ला अनन्न साधारण महत्त्व आहे.मन आणि शरीर शुद्ध करण्याचा तो एक मार्ग आहे.
आजच्या या कठीण काळात ही माणसाला निरोगी आणि चिंतामुक्त ठेवण्याचे काम रोजा करतो.रोजा असणाऱ्या व्यक्ती दिवसभर काहीही खात किंवा पाणी सुद्धा पीत नाही.सध्या उन्हाळा सुरू असल्याने रोजा धरणे कठीण समजली जाते.मात्र उमरखेड येथील मदिया फिरदोस इब्राहीम खान पठाण वय वर्ष सहा ह्या चिमुकलीने रोजा धरल्याने ती चर्चेचा विषय ठरलेला आहे.सध्या जगावर भेडसावत असलेल्या ‘कोरोना’ संकटाने लवकर हद्दपार व्हावे ह्यासाठी तिने रोजा धरल्याचे म्हटले आहे.