संयुक्त पत्रकार संघ उमरखेडची कार्यकारिणी गठीत अध्यक्ष रितेश पाटील कदम तर सचिव पदी किरण भाऊ मुक्कावार यांची निवड.
संयुक्त पत्रकार संघ उमरखेडची कार्यकारिणी गठीत
अध्यक्ष रितेश पाटील कदम तर सचिव पदी किरण भाऊ मुक्कावार यांची निवड
उमरखेड:-
आज दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ, लोकशाहीचा आरसा राष्ट्रीय पत्रकार दिन तसेच पत्रकारितेची पायाभरणी करणारे”दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर”यांच्या जयंती चे औचित्य साधून संयुक्त पत्रकार संघाची सन २०२३ या वर्षाची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली.
सर्वप्रथम दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून संयुक्त पत्रकार संघाची सर्वांनुमते अध्यक्ष:-रितेश पाटील कदम, सचिव:- किरण भाऊ मुक्कावार, उपाध्यक्ष:-गजानन वानखेडे, कोषाध्यक्ष:-सुरेंद्रनाथ दळवी, कार्याध्यक्ष:-दिलीप मुनेश्वर, सहसचिव:-प्रवेश कवडे तसेच सदस्य पदी सुनील ठाकरे, सुनील लोखंडे, सुभाष वाघाडे, विजय कदम, विशाल मस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संयुक्त पत्रकार संघाचे मार्गदर्शक:- विलासराव चव्हाण, सल्लागार:-शिवाजीराव माने, रवींद्र जैन यांचे प्रमुख उपस्थितीत वरील कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली असून एकसंघ राहून समाजहिताचे कार्य, अन्यायाविरुद्ध लढा देण्यास सदैव तत्पर राहणे विषयी पत्रकार संघातील ज्येष्ठ मंडळी तर्फे मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्रनाथ दळवी यांनी केले, गजानन वानखेडे यांनी सर्वांमध्ये निवड झालेल्या पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.


I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.