महात्मा ज्योतिबा फुले विध्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा विविध उपक्रमाणे संपन्न.

youtube

महात्मा ज्योतिबा फुले विध्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा विविध उपक्रमाणे संपन्न.

उमरखेड :(3 जानेवारी )

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 जयंती सोहळा महात्मा ज्योतिबा फुले विदयालय उमरखेड या ठिकाणी विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक प्रमोद देशमुख हे विचार मंचावर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून उमरखेड शहर व परिसरातील विविध प्रसिद्ध महिला उपस्थित होत्या.
यामध्ये प्रसिद्ध विधिज्ञ् भक्ती चौधरी, डॉ. धोंगडे मॅडम, पत्रकार व नारीशक्ती च्या सविता चंद्रे, सौ. चंदा देशमूख, तर विदयालय पर्यवेक्षक सुरते सर, तुपेकर सर, शिंदे बाबू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सावित्रीबाई यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. मान्यवरांचे स्वागत या प्रसंगी करण्यात आले.

कार्यक्रम प्रास्तविक कु. प्राप्ती शेटे हिने केले. या कार्यक्रम प्रसंगी सावित्रीबाई यांच्या जीवनावर अनेक विध्यार्थी यांनी विविध गीते वेशभूषा, भाषणे,नाटिका इ सादर केले व प्रबोधन केले याला प्रचंड प्रमाणात टाळ्या वाजवत दाद दिली.

मान्यवर व प्रमुख अतिथी यांनी क्रांती ज्योती फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व सर्वाना मार्गदर्शन केले.

कार्यक्रम अध्यक्ष श्री. देशमूख सर यांनी शिक्षणाचे महत्व सांगितले व आजच्या मुलीने विविध प्रसंगी कसं वागावं या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमचे आयोजन सौ. देवसरकर मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन जाहन्वी भारसाकळे व प्राप्ती शेटे ने केले.
या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षिका शिक्षेकतर कर्मचारी वृंद व विध्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

4 thoughts on “महात्मा ज्योतिबा फुले विध्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा विविध उपक्रमाणे संपन्न.

  1. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!