असुरक्षित अन्न ही धोक्याची घंटा डॉ. विजय माने.

youtube

 

असुरक्षित अन्न ही धोक्याची घंटा
डॉ. विजय माने.

बेरोजगार युवकांना आणि बचत गट महिलांना अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज ओळखून, कृषी महाविद्यालय उमरखेड येथे २५ जानेवारी २०२३ रोजी लोकनेते भाऊसाहेब माने यांच्या ३० व्या स्मुती दिना निमित्त एक दिवसीय भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळे मध्ये केंद्र सरकारच्या पंतप्रधान सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय माने तर या कार्यशाळेचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन यवतमाळ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. कृष्णराव जयपूरकर यांच्या हस्ते लोकनेते भाऊसाहेब माने यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. ग्रामीण भागातील शेतकरी महिला व युवक यांना अन्न प्रक्रिया मध्ये उद्योग उभारणीस असलेल्या संधी व त्यासाठी राष्ट्रीय बँकांचे आर्थ सहाय व केंद्र व राज्य शासनाचे अनुदान घेऊन कच्चा शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारून ब्रॅण्डिंग, पॅकींग आणि मार्केटिंग ची माहिती देण्यात आली. स्वतःच्या पोटाला पिळ देऊन दुसऱ्यांचे पोट भरणाऱ्या या पूर्णब्रह्मा चा उत्पादकच जर उपाशी असेल तर ते अन्न पूर्णब्रह्म कसे असू शकते? ते विषारी झाल्याशिवाय राहणार नाही, असुरक्षित अन्न व खाद्य पदार्थ हे आरोग्याला धोक्याची घंटा देत आहे. बाजारामध्ये अन्न पदार्थांमध्ये भेसळी चे प्रमाण वाढते आहे. ग्राहक शेतकऱ्यांवर विश्वास ठेवतो आहे व शेतकरी भेसळ करू शकत नाही त्यामुळे अन्न प्रक्रिया व ब्रॅण्डिंग करून शेतमाल व भाजीपाला विकल्यास बाजारामध्ये वाव निर्माण होतांना दिसत आहे असे उदगार अध्यक्षीय भाषणात डॉ विजय माने यांनी केले. तसेच अन्न प्रक्रिया करण्याच्या संधी या बाबत मार्गदर्शन निवृत्त जिल्हाधिकारी श्री राम गांगराणी व बँकेचे कर्ज व परत फेड या विषयावर
लीड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्री. अमर गजभिये, श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष श्री अनिरुद्ध पाटील चोंढिकर, निवृत्त पोलिस अधीक्षक श्री गोपीनाथ पाटील, कृषी अधिकारी श्री. डी. जी. खांदवे,अन्न व औषधी प्रशासन चे अधिकारी श्री गोपाल माहुरे, उमरखेड तालुक्या साठी PMFME योजने चे जिल्हा संसाधन व्यक्ती श्री. एस. व्ही. माळकर, एम.सी.ई.डी. चे प्रकल्प अधिकारी श्री. आर. एस. हिरुळकर, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ चे प्राध्यापक डॉ. पी. पी. थोरात व डॉ. एन. डी. सोळंके, भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक श्री. शजील बाळकृष्णन व उपव्यावस्थपक श्री. सुदर्शन शेलार यांनी महिलांनी आपल्या पाक कला व कौशल्याचा उपयोग उद्योगा मध्ये करावा तसेच प्रकल्प सादर करण्यासाठी
व प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी व राष्ट्रीय बँकांनी कर्ज संबंधित मार्गदर्शन व प्रक्रिया उद्योग व त्याला लागणारी यंत्र सामुग्री ब्रॅण्डिंग, पॅकिंग, लेबलिंग तसेच कर्ज आणि अनुदान यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स बाबत सखोल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचा लाभ ग्रामीण भागातील अडीच हजार महिला, पुरुष आणि युवकांनी घेतला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री महेश पानपट्टे यांनी कार्यक्रमाचा हेतू व भाऊसाहेब माने यांची स्वातंत्र्य सेनानी, समाजकारण, राजकारण, सहकार, व शिक्षणा मध्ये याभागात केलेल्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. अनुभवी व यशस्वी वऱ्हाडी मसाले उद्योजक श्री. अनिल इंगळे यांनी त्यांची यशोगाथा सांगितली, या कार्यशाळमध्ये भाऊसाहेब माने यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या सर्वच संघटना, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी आणि पुरोगामी युवा ब्रिगेड चे कार्यकर्ते यांनी सहकार्य केले, सर्वांचे आभार प्रदर्शन श्री गजानन माने यांनी करून कार्यक्रमाची सांगतता करण्यात आली.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!