अनुसूचित जाती विभाग यवतमाळच्या जिल्हा उपाध्यक्षपदी साहेबराव कांबळे यांची नियुक्ती.

अनुसूचित जाती विभाग यवतमाळच्या जिल्हा उपाध्यक्षपदी साहेबराव कांबळे यांची नियुक्ती
उमरखेड :-
अनुसूचित जाती विभाग यवतमाळच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांची नियुक्ती यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभाग चे जिल्हाध्यक्ष महेंद्र नवसाजी कावळे यांनी 27 जुलै रोजी केली आहे.
कांबळे हे उमरखेड विधानसभेत करत असलेल्या सामाजिक कामाप्रती आणि नागरिकांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेसची विचारधारा जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून उमरखेड आणि महागाव तालुक्यात अनेक सामाजिक कामे करण्यासाठी साहेबराव कांबळे आघाडीवर असतात. विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप, गरजूंना मदत , बंदी भागातील रस्त्यासाठी केलेला पाठपुरावा यासह अनेक कामे त्यांनी केली आहेत. भविष्यात काँग्रेसची ध्येयधोरणे जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अनुसूचित जाती विभाग चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांच्या आदेशावरून यवतमाळ जिल्हाध्यक्ष महेंद्र नवसाजी कावळे यांनी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून साहेबराव कांबळे यांची नियुक्ती केली आहे त्यांच्या नियुक्तीने त्यांच्या असंख्य चाहत्यांसह काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य संचारले आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे .