अनाथ अनुराधाच्या विवाह साठी साईप्रसाद परिवार झाले आई वडील.
अनाथ अनुराधा चा विवाहात साईप्रसाद परीवार झाले आई-वडील
हदगाव..
हदगाव तालुक्यातील निवघाबाजार येथुन तिनं किलोमीटर असलेल्या मौजे महाताळा येथील अनाथ अनुराधा गव्हाणे वयोवृद्ध आजोबा च्या मदतीने ताटव्याच्या घरात राहुन दिवस काढत विवाह जुळला पण पण विवाहाच्या तयारीसाठी आर्थिक परिस्थिती आडवी आली असल्या माहिती स्वयंसेवक प्रभाकर दहीभाते बंडु माटाळकर यांना समजल्यावर त्यांनी खात्री करून नांदेड येथील साईप्रसाद परीवाराला माहीती दिल्याने देशविदेशातील दानशूर व्यक्तींच्या दायीत्वाने अनाथ अनुराधा च्या विवाहाचा सर्व खर्चाची जबाबदारी पार पाडत आलमारी, गाधी पंलग संसार उपयोगी सर्व भांडी पाचशे पाहुणे मंडळीचे अन्नदान, सजावट टेन्ट, विवाहाचा सर्व खर्चाची जबाबदारी उचलत आई-वडील नसल्याची उणीव भासु दिली नाही.
पंचेवीस रोजी अनुराधा चा विवाह मोठ्या थाटामाटात अंगणात पार पडला.विशेष म्हणजे बळीराजा चेतना अभियानांतर्गत पार पडत असलेल्या या सामाजिक उपक्रमात शुभ आशिर्वाद देण्यासाठी माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर , हदगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हनुमंतराव गायकवाड , सह्यायक पोलिस निरीक्षक दिपकजी फौलाने , जमादार चिंतले , नरवाडे, माजी उपसभापती विवेक देशमुख, गजानन पाटील मनुलेकर, सामाजिक कार्यकर्ते अनुपजी सारडा ,राजुजी पांडे , दिपकराव पाटील पळसेकर, साईप्रसाद स्वयंसेवक,निवघाबाजार पत्रकार संघ, यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक नातेवाईक पाहुणे मंडळी उपस्थित होते.