कुणब्यांच्या इतर पुराव्याला सुद्धा ग्राह्य धरून त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र द्या. – संजय मस्के
कुणब्यांच्या इतर पुराव्याला सुद्धा ग्राह्य धरून त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र द्या.
– संजय मस्के
प्रतिनिधी / ५ नोव्हेबर
उमरखेड –
मनोज जरांगे पाटला ला पाठिंबा देण्यासाठी ढाणकी येथे गेल्या तीन दिवसापासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली
या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना यवतमाळ जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष संजय मस्के यांनी अधिकारी वर्गांनी कुणबी समाजाच्या इतर पुराव्यांचा विचार करून त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र द्यावे अशी भूमिका मांडली.
उमरखेड – महागाव – पुसद या तालुक्यात फार कमी प्रमाणात कुणबी जातीच्या नोंदी आहेत परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खरेदी खतावर, सातबारावर व इतर कागदपत्रांवर कुणबी जातीचा उल्लेख आहे. त्यांचा विचार अधिकारी वर्गानी केला पाहिजे
अशी विनंती त्यांनी यावेळी केली शांततेच्या व न्याय हक्काच्या मागणीसाठी चाललेल्या शांततापूर्ण आंदोलनाची दखल शासनाने घेतली असली तरीही काही नेते समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम चालवत आहेत या प्रवृत्तीला ताबडतोब आवर घालावा असे आव्हान त्यांनी यावे केले .विदर्भामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख यांनी केलेल्या चळवळीमुळे बहुतांश लोकांनी कुणबी ही जात नोंदवली परंतु अद्यापही विदर्भातील अनेक लोक कुणबी जातीच्या सवलती पासून वंचित आहेत त्यांना देखील योग्य तो न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी त्यांच्या समवेत प्रकाश जाधव ,अमोल आरमाळकर, केशव पवार, गजानन चव्हाण चिकणे पाटील व इतर मंडळी उपस्थित होते
सोबत –
उपोषणाचा फोटो