सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभुषण पुरस्कार 2022 जाहीर.
सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभुषण पुरस्कार 2022 जाहीर
पुरोगामी युवा ब्रिगेड च्या तृतीय वर्धापन दिनी होणार वितरण
तालुक्यातील 15 व्यक्ती व संस्थांची पुरस्कारासाठी निवड
उमरखेड/ प्रतिनिधी: दरवर्षी देण्यात येणारा सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार 2022 जाहीर करण्यात आले असुन तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या 15 व्यक्ती व संस्थांची निवड यात करण्यात आली असुन पुरोगामी युवा ब्रिगेड च्या तृतीय वर्धापन दिनी तसेच संविधान दिवस आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मुर्ती दिनानिमित्त दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
सदर पुरस्काराच्या आयोजनाचे हे तृतीय वर्ष असून या वर्षी डॉ. विजयराव माने यांच्या संकल्पनेतून उमरखेड तालुका व परिसरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात योगदान दिलेल्या, आपल्या कार्यातून ठसा उमटवलेल्या 15 स्वर्गवासी महानुभवांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ सन्मानार्थ पुरस्कार दिला जाणार आहे.
पुरोगामी युवा ब्रिगेड आणि सत्यशोधक भाऊसाहेब माने गौरव कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 नोव्हेंबर 2022 वेळ दुपारी 12 वाजता श्रीराम टॉकीज मंगल कार्यालय , उमरखेड येथे संविधान दिनानिमित्त व महात्मा जोतिबा फुले स्मुर्ती दिनी, पुरोगामी चा तृतीय वर्धापन दिनी सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभुषण पुरस्कार चे वितरण समारोह चे आयोजन करण्यात आलेले आहे .
सदर पुरस्कारासाठी 15 व्यक्ती व संस्थेची निवड करण्यात आली असून यामध्ये डॉ विवेक पत्रे (आरोग्य सेवा ), शेख गुलाब (माजी सैनिक, ब्राम्हणगाव ),श्री अजित धात्रक (शैक्षणिक ), श्री जयराम धोंगडे (कवी, साहित्यिक ),कु. प्रियंका चौधरी (वाचन चळवळ ), सविता चंद्रे (महिला सक्ष्मीकरण व पत्रकारिता ), श्रीमती शिवकांता अविनाश पोंगाने (महिला उद्योजीका ), भोजाजी सूर्यवंशी (दिव्यांग ),श्री संतोष कलाने( पत्रकारिता ), गणवंत काळे (शैक्षणिक उपक्रम , हदगाव ), श्री विजय पतंगे (प्रशासन ), श्री किसनराव शिंदे (उद्योजक ), पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था, उमरखेड (पर्यावरण ), मोक्षधाम समिती, नागापूर (सामाजिक वनिकरण ) श्री उत्तमश्लोक वाडमय मंडळ, उमरखेड (शतक महोत्सवी वर्ष ), आदींना या वर्षीचा पुरस्कार जाहीर झालं असुन आदींना मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 27 नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी 12 वाजता श्रीराम मंगल कार्यालय, ढाणकी रोड उमरखेड येथे पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पुरोगामी युवा ब्रिगेड व सत्यशोधक भाऊसाहेब माने गौरव कृती समिती उमरखेड च्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.