राष्ट्रगीतासह संविधानाच्या उद्देशिकेचे संविधान दिनी सामूहिक पठण करा. वंचित बहुजन आघाडीची निवेदनाद्वारे मागणी .

youtube

राष्ट्रगीतासह संविधानाच्या उद्देशिकेचे संविधान दिनी सामूहिक पठण करा.

वंचित बहुजन आघाडीची निवेदनाद्वारे मागणी

उमरखेड प्रतिनिधी.
हर घर तिरंगा व सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या धर्तीवर ,येत्या 26 नोव्हेंबर रोजी म्हणजेच संविधान दिनानिमित्त, भारतीय संविधानाची जनजागृती व्हावी, तसेच नागरिकांसह विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक एकता निर्माण होऊन राष्ट्रभक्तीची भावना जागृत व्हावी या उद्देशाने उमरखेड तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात सर्व सरकारी खाजगी शाळा आणि कॉलेज, नगरपरिषदा नगरपंचायत आणि ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रगीतासह भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक पठण करण्यात यावं व तसेच सर्व शाळा कॉलेज यांच्या माध्यमातून संविधान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात याव अशी मागणी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, गटविकास अधिकारी वानखडे , गटशिक्षणाधिकारी दर्शनवाड यांचे कडे वंचित बहुजन आघाडीचे वतीने करण्यात आली यावेळी वंचित चे जिल्हा सचिव जॉन्टी तथा प्रशांत विणकरे , तालुका प्रमुख संतोष जोगदंडे, ढाणकी नगरपंचायत चे नगरसेवक संबोधी गायकवाड, देवानंद पाईकराव मार्शल विनोद बरडे सर,बाबुराव नवसागरे,राजेश घुगरे,अॕड.पंजाब नवसागरे सर सुमेध घुगरे , उपस्थित होते

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!