सत्यशोधक लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब माने यांचा स्मृतिदिन साजरा 108 गरजूंना चष्मे मोफत वाटप.

youtube

सत्यशोधक, लोकनेते स्वा. भाऊसाहेब माने यांचा स्मृतिदिन साजरा. 108 गरजूंना चष्मे मोफत वाटप
चातारी….
येथील शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकनेते, सहकारमहर्षी, उमरखेड विधानसभेचे माजी आमदार आदरणीय भाऊसाहेब माने यांची पुण्यतिथी 9 जानेवारी 2022 रोजी साजरी करण्यात आली. स्मृतिदिन कार्यक्रमाचे औचित्य साधून 12 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे आयोजनातील 108 गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक बापूराव माने सर लाभले . प्रास्ताविक कृषी शास्त्रज्ञ सन्माननीय डॉ.विजयराव माने यांनी केले प्रास्ताविकातून भाऊसाहेबांच्या बलदंड शरीरयष्टी तसेच भाऊसाहेबांच्या सामाजिक बांधिलकी विषयी उजाळा दिला. भाऊसाहेबांच्या जीवन पटावर प्राचार्य वि.ना. कदम प्रज्ञानंद खडसे शिवाजीराव माने, विलासराव चव्हाण, शंकरराव जाधव, शेषराव पाटील माने यांनी प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणातून बापूराव माने सरांनी भाऊसाहेबांविषयी असा लोकनेता होणे नाही असे गौरवोद्गार काढले.
स्मृती दिनाचे औचित्य साधून शिवाजी शिक्षण संस्था,पुसद चे नवनियुक्त अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांना शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिवाजी शिक्षण संस्थेचे नवनियुक्त संचालक काशीराव पाटील कदम यांचा सत्कार तसेच चातारीचे पोलीस पाटील शिवाजीराव शंकरराव माने सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
चातारीतील समस्त गावकरी बंधू-भगिनी तसेच डॉ. राजेश माने. रमेशराव चव्हाण, सुधाकर लोमटे, डेविड शहाणे,परमात्मा अण्णा गरुडे, हनवते, श्री बालाजी वानखेडे, अरविंद भोयर, सुनील शहाणे, डॉ. जाधव, अशोकराव वानखेडे, श्रीधर देवसरकर, काशीराव पाटील कदम, सुनील देवसरकर, संतोष कदम, राजू वानखेडे, गजानन वाघमारे, गजानन देशमुख, बसवेश्वर शिरसागर, जाकिर राज, गुणवंत सूर्यवंशी, रमेश चव्हाण, सविताताई चंद्रे, शाहरुख पठाण, शिवानंद सुरोशे, बालाजी वानखेडे, सरपंच रंजना माने आदी मान्यवर उपस्थित होते.
संचालन प्रा. संतोषराव माने सर यांनी केले. तसेच संदीप वानखेडे यांनी आभार मानले .
व कार्यक्रम यशस्वीतेसाठी चातारी गावातील भाऊसाहेबांवर प्रेम करणारी मंडळी तथा शिवाजी विद्यालयातील सर्व कर्मचारी मंडळीनी सहकार्य केले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!