उमरखेड महागाव विधान सभे करिता सत्यशोधक शेतकरी संघा तर्फे विजयराव खडसे यांना जहीर पांठिबा सत्यशोधक शेतकरी संघाची घोषणा

youtube

उमरखेड महागाव विधान सभे करिता सत्यशोधक शेतकरी संघा तर्फे विजयराव खडसे यांना उमेदवारी जाहीर
पत्रकार परिषदेत सत्यशोधक शेतकरी संघाची घोषणा

चौकटः आपल्या मातीतला आपला माणूसच आपल्या कामी येणार, नितीन माहेश्वरी, कार्याध्यक्ष, सत्यशोधक शेतकरी संघ.

प्रतिनिधी

उमरखेड

दिनांक 4 नोव्हेंबर रोजी उमरखेड-महागांव विधानसभेत तब्बल 25 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली असून 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सत्यशोधक शेतकरी संघाच्या वतीने ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता, या संघटनेतर्फे माजी आमदार विजयराव खडसे यांची सत्यशोधक शेतकरी संघाचे सर्व पदाधिकारी यांनी बैठकी मध्ये विचार विमर्श करून विजयराव खडसे यांची अधिकृत उमेदवारी, निश्चित केली आहे असे पत्रकार परिषदेत श्रीहरी सुपर मार्केट उमरखेड येथे सत्यशोधक शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष नितीन माहेश्वरी, भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने, संघटनेचे पदाधिकारी श्रीराम पाटील नलवाडे, उमाकांत मडके, डॉ. वि. ना. कदम, देवानंद मोरे, बालाजी वानखेडे, गजाननराव सुरोशे यांच्या सह संघटनेच्या सर्व सभासदा समक्ष पार पडलेल्या सभेमध्ये ठराव करून पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.

उमरखेड-महागांव मतदार संघात काँग्रेस, भाजपा, मनसे, या प्रमुख पक्षासह सत्यशोधक शेतकरी संघाचे विजयराव खडसे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केल्यामुळे उमरखेड महागाव विधानसभेत चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील वर्षी सत्यशोधक शेतकरी संघाने जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीची निवडणूक लढवून संस्थेवर सत्ता स्थापन केली होती या निवडणुकीत विजयराव खडसे यांनी सत्यशोधक शेतकरी संघाला खंबीरपणे साथ दिली होती खडसे हे आपल्या मातीतील आपला माणूस असून सत्यशोधक शेतकरी संघाने त्यांच्या संघटनेच्या कार्यपध्दती प्रमाणे विजयराव खडसे यांच्या कडून निवडून आल्या नंतर निस्वार्थ भावनेने सेवाकार्य करणे संबंधी सदाचार संकल्प प्रतिज्ञापत्र घेऊन उमेदवारी जाहीर करून निवडून आणण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे त्यामुळे उमरखेड-महागांव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!