सोमेश्वर आडे ची रिसर्च फेलोशिप साठी निवड.
सोमेश्वर आडे ची रिसर्च फेलोशिप साठी निवड
पुसद :- दिनांक 12 नोव्हेंबर
पुसद चा मेधावी विद्यार्थी सोमेश्वर संजय आडे याने उच्च शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेतली आहे त्याची प्राईम मिनिस्टर रिसर्च फेलोशिप साठी निवड झाली आहे.
सोमेश्वर चे प्राथमिक शिक्षण नगर परिषद शाळेतून तर माध्यमिक शिक्षण कोषटवार दौलतखान विद्यालय यातून झाले. शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथून प्राविण्यासह त्याने पॉलिटेक्निक केले. पुणे येथील काशीबाई नवले इंजीनियरिंग मधून तो ८०% गुण मिळवून उत्तीर्ण झाला.सातत्याने यशस्वी पायरी चढणाऱ्या सोमेश्वर ला पुढे राऊरकेला NIT कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला सेकंड टॉपर हे रौप्य पदक मिळवून तो MTech झाला. सध्या तो IIT हैदराबाद येथे PHD करीत असुन त्याची प्राईम मिनिस्टर रिसर्च फेलोशिप साठी (PMRF) निवड झाली आहे.
सोमेश्वर हा जुन्या पिढीतील आडे मेडिकल चे शशिकांत आडे यांचा नातु व डॉ संजय व स्नेहल यांचा मुलगा आहे. त्याच्या या शैक्षणिक भरारीचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.