देश हितासाठी व लोकसभाविकासाठि महायुतीचे उमेदवारबाबुराव कदम यांना दिल्लीत पाठवा : -रामदास पाटील सुमठाणकर       

youtube

देश हितासाठी व लोकसभाविकासाठि महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांना दिल्लीत पाठवा : -रामदास पाटील सुमठाणकर

प्रतिनिधी :

मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी भाजपचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी सक्रीय होऊन झपाटून कामाला लागले आहेत.पायाला भिंगरी बांधून बूथ निहाय,सर्कल निहाय संवाद दौरा सुरू झाला आहे.
भारताला एक बलशाली राष्ट्र बनविण्यासाठी आपण सर्वजण कार्य करत आहोत यासाठी मोदी साहेबांना एक मत आपल्या हिंगोली लोकसभेचे असेल हा ठाम विश्वास आहे.
महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम हे सामान्य कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे त्यांना सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाणीव आहे म्हणून  सर्वसामान्य जनतेची प्रश्न दिल्ली दरबारी अतिशय पोटतिडकीने मांडतील असा विश्र्वास असल्यामुळे बाबुराव कदम यांच्या पाठी मागे भाजपची सर्व संघटनात्मक यंत्रणा सज्ज असल्याने ते सहज विजयी होतील असा विश्वास रामदास पाटील सुमठाणकर यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालीच देशाचा विकास झाला आहे. ‘सब का साथ,सब का विकास,’ या मोदींजीच्या घोषणेवर विश्वास ठेवून आम्ही कार्यकर्ते कामाला लागलो आहोत.मोदीजीं पुन्हा ३ री वेळ पंतप्रधान होणार याची संपूर्ण जगाला खात्री आहे. प्रत्येक मतदाराने जात, धर्म सोडून मोदीजींना मतदान देण्याचे ठाम मत बनवले आहे.
ही राष्ट्रीय निवडणूक असल्यामुळे देश हितासाठी एक मत मोदीजींना देण्याची विनंती रामदास पाटील यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांनी केलेली कामे सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचली असल्याने आमच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे असे ते सांगतात आणि मागील लोकसभेच्या मतापेक्षा जास्त मताधिक्याने आमचा उमेदवार जिंकून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हिंगोली लोकसभेत बाबूराव कदम कोहळीकर यांना विक्रमी मताधिक्याने विजयी  मिळण्यासाठी सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी कंबर कसून काम करावे असे आवाहन केलं. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे  मनोमीलन असून एक वज्रमुठीने दिवस रात्र कार्य करत आहेत.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!