गैरवारसाचे सातबारा चढवले नाव.

youtube

गैरवारसाचे सातबारा चढवले नाव .

[वारसदार बसले आमरण उपोषणाला ]

उमरखेड प्रतिनिधी . :

तालुक्यातील मोजा सुकळी जहागीर येथील शेत सर्वे नंबर जुना 66 यानंतरचा नवीन शेत सर्वे नंबर 164 शेत्रफळ आठ हेक्टर 59 आर यापैकी प्रभाकर सोनबा वानखेडे यांच्या मालकीची जमीन चार हेक्टर 59 आर असून यांचा सातबारा त्यांच्या कुटुंबाच्या नावाने होता परंतु मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आपल्या आर्थिक स्वार्थापोटी गैरवारासांची नावे टाकलेली असल्याने ती काढण्यासाठी दिनांक 24 जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर प्रभाकर सोनबा वानखेडे रा . सुकळी (ज ) हे शेतकरी आमरण उपोषणासाठी बसले आहे .
शेत सर्वे नंबर 164 8 हेक्टर 59 आर इतकी जमीन पूर्वीपासून प्रभाकर वानखेडे यांच्या पूर्वजाकडे होती त्यामध्ये 1932 स*** वाटण्या होऊन दोन समान भाग झाले असता त्यानुसार प्रभाकर सदरील शेतीवर उदरनिर्वाह करीत असे परंतु त्यांची त्यांच्याकडे सातबारा नुसार शेती असून सुद्धा ही गैरवासांची नावे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याशी आर्थिक संबंध साधून गैरवारासांची नावे सातबारा वर चढवली असल्याचे प्रभाकर वानखेडे यांनी वारंवार प्रशासकीय अधिकारी यांना निवेदने तथा उपोषणही केली तरी पण प्रशासनाने या बाबीकडे लक्ष न देता निव्वळ आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले .
सदर शेत जमीन गैरवारास पूर्णपणे फायदा घेत असल्याने प्रभाकर वानखेडे हे आपल्या शेतीत कामासाठी गेले असता गैर वारसदार त्यांना जिवे मारण्याची धमकी देत असतात त्यामुळे प्रभाकर वानखेडे यांच्या मालकीच्या सातबारा वरून गैरवारासांची नावे काढण्यात यावी करिता दिनांक 24 जानेवारी रोजी प्रभाकर सोनबा वानखेडे राहणार सुकळी उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या प्रांगणात आमरण उपोषणासाठी बसले आहेत .

Google Ad
Google Ad

1 thought on “गैरवारसाचे सातबारा चढवले नाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!