पाण्याच्या टाक्यावर चढून नगरसेवकांचे शोले स्टाईल आंदोलन.

पाण्याच्या टाक्यावर चढून नगरसेवकांचे शोले स्टाईल आंदोलन.
ढाणकी
ढाणकी नगरपंचायत ची रखडलेली विकास कामे निवेदन देऊनही सुरळीतपणे सुरू होत नाहीत. नगरपंचायत प्रशासन जनसामान्यांच्या कामासाठी आडकाठी धोरण अवलंबून नगरसेवकांची मुस्कटदाबी करत आहे. घरकुलाचा प्रश्नही अधांतरीच असे अनेक जनसामान्यांचे प्रश्न व न.पं. प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून नगरसेवकांनी आज नगरपंचायत कार्यालयाला चपलाचा हार घालून व पाण्याच्या टाक्यावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. यात भाजपाचे गटनेते संतोष पुरी, उमेश योगेवार, समर्थक साईनाथ मंतेवाड, पंकज केशवाड यांनी सहभाग घेतला.
मागील तीन वर्षापासून ढाणकी शहरांमध्ये फक्त विकास काम होत असल्याचा आव आणल्या जात आहे. ढाणकीकरांच्या पाचवीला पूजलेला पाणी प्रश्न? अद्यापही नगरपंचायत ला सोडवण्यात यश आले नाही. घरकुलसाठी लागणारे कागदपत्रे सामान्य नागरिकांना नगरपंचायत कडुन मिळत नाही, यामुळे आमची आणि जनतेची कुचंबना होत आहे. नगर पंचायत मध्ये नगरसेवकांचेच म्हणणे कोणी ऐकत नसून, तेथे सामान्य माणसाला कश्या प्रकारे वागणूक दिली जात असेल? याचा विचार न केलेला बरा. या सर्व बाबीला आता आम्ही कंटाळलो असून या हेकेखोर नगरपंचायत प्रशासनाविरुद्ध आम्ही हे आंदोलन करत असल्याचे नगरसेवक संतोष पुरी यांनी सांगितले.
जोपर्यंत रखडलेली विकास कामे सुरळीतपणे होणार नाही, तोपर्यंत आम्ही पाण्याच्या टाक्यावरून खाली उतरणार नाही. असे धोरण आंदोलनकर्ते नगरसेवकांनी अवलंबिले. वृत्त लिहीपर्यंत मुख्याधिकारी हे आंदोलनकर्ते यांच्या भेटीस आले नव्हते.
*चौकट : -*
मागील काही दिवसापासून ढाणकी न.पं. मध्ये फक्त चार नगरसेवकांच्या शब्दांना किंमत आहे. आमचे कुणी ऐकत नाही. चार दिवसापासून ढाणकी शहरातील घनकचरा व्यवस्थापनच्या घंटागाड्या बंद आहेत. तसेच वीस दिवसा अडून शहराला पाणीपुरवठा होत असतो. नवीन रस्ते, इतर विकास कामाचे कृती आराखडे चुकीच्या पद्धतीने बनवल्यामुळे ती सुद्धा विकास कामे रखडलेली आहेत. आम्ही सत्ताधारी पक्षात असून सुद्धा आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येते. हे आमचे दुर्दैव म्हणावे काय? म्हणून आम्ही आजपासून निर्धार केला, जगेल तर ढाणकीच्या विकासासाठी मरेल तर ढाणकीच्या विकासासाठी.आता एकच ध्यास ढाणकीचा सर्वांगीण विकास.
संतोष पुरी
भाजपा गटनेते
उमेश योगेवार
भाजपा नगरसेवक
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://www.binance.com/fr/join?ref=OMM3XK51