सहस्त्रकुंड धबधबा ओलांडून येत असते वेळी पाच प्रवासी नदी पात्रात अडकले . प्रशासनाने वेळीच मदत केल्याने वाचले त्यांचे प्राण. ढाणकी प्रतिनिधी

youtube

सहस्त्रकुंड धबधबा ओलांडून येत असते वेळी पाच प्रवासी नदी पात्रात अडकले .

प्रशासनाने वेळीच मदत केल्याने वाचले त्यांचे प्राण.

ढाणकी प्रतिनिधी
सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यास संपूर्ण महाराष्ट्रातून तेलंगना राज्यातून पर्यटक येत असतात. आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सहस्त्रकुंड धबधबा येथे एक्काम्बा येथील भाविक देव दर्शना करीता नदी पलीकडे गेले होते. जाताना नदी पात्रात पाणी कमी असल्याने त्यांनी नदी पत्रातून पायी जात इस्लापूर तालुक्यातील एका श्रद्धा स्थानाला भेट देऊन परतीच्या वेळी तोच मार्ग निवडला व नदी पात्रातून ते येऊ लागले.
नदी पात्राच्या मध्य भागी येताच नदीवर जवळच असलेल्या मुरली डॅम वरून पाणी सोडण्यात आले त्यामुळे कोरडी असलेल्या नदी मध्ये पाण्याचा प्रवाह वाढला . व नदीपात्रातून येणारे प्रवासी मधोमध अडकले. त्यामुळे त्यांची एकच घाबरगुंडी उडाली. त्यामध्ये अनुसया दिगंबर ताडमवार , पूजा दिगंबर ताडमवार , गजराबाई शिवाजी काटेवार, सुवर्णा ज्योतीराम गांबरवार, विनायक ज्योतीराम गांबरवार, कामिनी ज्योतीराम गांबरवार वय वर्ष 5 , कोमल शिवाजी काटेवाड, मोठ मोठ्यांनी ओरडू लागले.
धबधबा पाहण्यास आलेल्या पर्यटकानी आवाजाच्या दिशेने जात पाहणी केली असता त्यांना नदी पात्रात धबधब्याच्या मधोमध तीन महिला एक पुरुष एक चिमुरडी मुलगी दिसली. त्यांनी त्वरित विश्राम गृहच्या कर्मचाऱ्याला माहिती दिली. विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्याने त्वरित बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी त उपविभागीय अधिकारी सखाराम मूळे, तहसीलदार राजेश सुरडकर यांना कल्पना दिली. नदी पत्रात असलेल्या मुरली बंधरा येथून पाणी सोडण्यात आले ते पाणी त्वरित बंद करण्याचा सूचना बंधारा कर्मचाऱ्याला दिल्या. कर्मचाऱ्याने त्वरित नदी वरील गेट बंद करून पाणी पुरवठा थांबवीला. स्थानिक मच्छिमार यांना पाचरण करून नदी पत्रात अडकलेल्या प्रवास्यांना सुखरूप बाहर काढण्यात आले.
उपविभागीय अधिकारी सखाराम मूळे, तहसीलदार राजेश सुरडकर, ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी सहस्त्रकुंड धबधबायला भेट देऊन अडकलेल्या प्रवास्यांना धीर दिला.

1 thought on “सहस्त्रकुंड धबधबा ओलांडून येत असते वेळी पाच प्रवासी नदी पात्रात अडकले . प्रशासनाने वेळीच मदत केल्याने वाचले त्यांचे प्राण. ढाणकी प्रतिनिधी”

  1. [3090]takabet login এবং বিকাশ দিয়ে অনলাইন ক্যাসিনো গেম খেলুন,takabet app download করে সেরা অনলাইন স্লট গেম এবং লাইভ ক্যাসিনো খেলার নিয়ম জানুন। আজই takabet login করুন এবং গেম উপভোগ করুন। visit: takabet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!