शिवसेना कार्यकर्त्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या तपासाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी ; अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कडे तपास सोपवा –
शिवसेना कार्यकर्त्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या तपासाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी ; अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कडे तपास सोपवा –
उमरखेड –
शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते रमेश गुलाबसिंग चव्हाण यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी, उमरखेड यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, १६ जून २०२५ रोजी रात्री सुमारे ११.४० वाजताच्या सुमारास रमेश चव्हाण हे मोटारसायकलने घरी जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांची मोटारसायकल अडवून लोखंडी रॉड व इतर हत्यारांनी मारहाण केली या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या गुन्ह्यातील आरोपी सय्यद आरिफ उर्फ धार सय्यद युसुफ, गोसुद्दीन मुज्जु मोददीन काझी आणि यांना अटक करण्यात आली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच अटक आरोपींनी परवेज उर्फ लाला सलीम खान याने हल्ल्याची सुपारी दिल्याची कबुली दिल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयानेही माहिती प्रसिद्ध केल्याचे सांगण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, रमेश चव्हाण यांचा वाळू व्यवसायाशी कोणताही संबंध नसून निवडणुकीच्या काळात त्यांनी परवेज उर्फ लाला सलीम खान यांच्या समर्थकांकडून करण्यात आलेल्या कथित गैरप्रकारांवर टीका केली होती. तसेच सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या काही व्हिडिओ क्लिप्सवर त्यांनी व इतर शिवसैनिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.हा तपास भरकटत असल्याची निवेदकर्त्या शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.
हल्ल्यामागील खरे सूत्रधार व संभाव्य सुपारी देणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते रमेश गुलाबसिंग चव्हाण यांच्यावर रेती माफियाकडून झालेल्या कथित प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागाकडून (CID) सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या प्रकरणाशी संबंधित एका व्हिडिओमध्ये काही स्थानिक पदाधिकारी व नेते दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे तपासावर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच संबंधित व्हिडिओ अनेकांकडून फॉरवर्ड करण्यात आल्याने प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर मूळ आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी आणि घटनेमागील संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी तपास गुन्हेगारी तपास विभागाकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1), 296, 326(2) व 3(5) अंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्याची विनंती संबंधित निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या वेळी प्रविण मिराशे , ॲड संजय जाधव , अनिल नरवाडे , ॲड अजय पाईकराव , कैलास कदम , राहुल मोहितवार , गोपाल राठोड , राहुल वानखेडे , पवन बिचेवार , प्रफुल चवरे , नागेश दिलेवार , बसवेश्वर क्षिरसागर , अभय पवार , शे ईफान शे ईसा , सपना चौधरी या सह ईतर शिवसैनिक उपस्थित होते
या मागणीमुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता असून, तपास यंत्रणा याबाबत काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सोबत –
फोटो


Finally found a site that actually feels fair. The Jilli slots are my favorite and the interface is super user-friendly. Give ankajilli777 a try if you want some real action.
Just what I was looking for in a gaming site. Simple registration and the luck seems to be on my side here. Big thumbs up for 777asgame.