अपघाताची मालिका सुरूच शिळोना -पोफाळी घाट ठरतोय जीवघेणा

अपघाताची मालिका सुरूच शिळोना -पोफाळी घाट ठरतोय जीवघेणा!
शिळोना पोफाळी रस्त्यावर कारची झाडाला जबर धडक,दोन जन गंभीर जखमी!
उमरखेड-:
पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिळोना घाटाजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या अपघाताची मालिका सुरूच आहे.दोन जुलै 2022 रोजी 12वाजता च्या दरम्यान दुचाकी आणि आयशर ला धडक लागून दोन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच
2 जुलै च्याच संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान दुसरी घटना घडली आहे. दुसऱ्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात उमरखेड वरुन पुसद कडे येणाऱ्या मारुती सुझुकी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने
कारची झाडाला जबर धडक लागून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल घडली आहे.
या अपघातातील
जखमींना पुसद येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून, यामध्ये सतीश टाचतोडे गंभीर जखमी झाले
ते पुसद महसूल कार्यालयात तलाठी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.
तर दुसरे जख्मी झालेले सतीश बोरकर यांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे.
सदर अपघाताची माहिती
पोफाळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री राजीव हाक्के यांना भ्रमणध्वनीवरून दिली असता माहिती मिळताच ते आपल्या कर्मचाऱ्या सह घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पंडित बिट जमादार किसन राठोड,रावसाहेब शेंडे ,शिवाजी भरोशे हे करीत आहेत.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Thank you very much for sharing, I learned a lot from your article. Very cool. Thanks. nimabi