महाराष्ट्र पोलीस पाटील दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिर शिवाजीराव माने व काशिनाथ कदम यांना सेवानिवृत्ती सत्कार जिल्हा अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ.
महाराष्ट्र पोलीस पाटील दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिर
शिवाजीराव माने आणि काशिनाथ पाटील कदम यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार ; जिल्हा पोलीस अधीक्षक यांची उपस्थित
उमरखेड /प्रतिनिधी :
पोलीस पाटील हे गावातील महत्त्वपूर्ण घटक असून पोलीस पाटील हे पोलीस प्रशासन व शासनाचा दुवा म्हणून कार्य करत असतात असे गौरवोदगार यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी कुपटी येथे कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.
यावेळी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, प्रमुख पाहुणे म्हणून कृषी शास्त्रज्ञ डॉ.विजयराव माने, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, तहसीलदार. आनंद देऊळगावकर, . अमोल माळवे, राजीव हाके. हनुमंत गायकवाड .पांचाळ, रवी कुमार धुळे, अंकुश वंजारे, निरंजन राठोड, जनार्दन लंगडूनकर,. रमण रावते पाटील तसेच बिटरगाव ढाणकी भोस , दराटी पोलीस स्टेशनं चे पोलीस निरीक्षक सुद्धा यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिवाजीराव माने व त्यांच्या पत्नी सौ मायाताई माने या दाम्पत्याचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच काशीराव पाटील कदम कृष्णापुर यांचासुद्धा सेवानिवृत्त निमित्त सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना शिवाजीराव माने हे भावुक झाले होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिवाजीराव माने यांचे वडील लोकनेते भाऊसाहेब माने यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या गौरवशाली वारसा उमरखेड तालुक्याला लाभलेला आहे. तसेच त्यांनी उदाहरण देऊन सांगितले की, आमच्या पोलिस प्रशासनातील याच तालुक्याचा एक कर्मचारी हा आमदार होऊ शकतो तर पोलीस पाटील असलेले शिवाजीराव माने हे भविष्यात आमदार का होऊ शकत नाही. असा आशावाद पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी व्यक्त केला. तसेच जातीय सलोखा राखण्यासाठी ऐक्य परिषदेचे आयोजन करण्याबाबत त्यांनी वाच्यता केली आहे . तसेच मी पोलीस अधीक्षक होण्या अगोदर माझे शिक्षण कृषी महाविद्यालयातच झाले असुन स मी सुद्धा कृषी पदवीधर आहे. अभ्यास करून आयपीएस झालो अशाप्रकारे कुपटी येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी मार्गदर्शन सुद्धा केले. तसेच त्यांनी यावेळी सांगितले की मी प्रथमच पोलीस पाटील सेवानिवृत्ती निम्मित कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.
कार्यक्रमात सत्कार मूर्तीचा जीवनपट सुधाकर वानखेडे यांनी सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त पोलीस पाटील माधवराव कदम यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन गजानन शिंदे यांनी केले तर आभार श्री हापसे (पोलीस पाटील टाकळी) यांनी मानले.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://accounts.binance.com/ph/register?ref=B4EPR6J0
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.