वीज कनेक्शन तोडण्याचा महावितरणाचा मुजोरीपणा सरत्या सालात ग्राहक अंधारात तर कर्मचारी आनंदात

youtube

विज कनेक्शन तोडण्याचा महावितरणचा मुजोरीपणा..सरत्या वर्षात ग्राहक अंधारात तर कर्मचारी आनंदात.

उमरखेड…

महामारीने लाँकडाऊन काळात कोणालाच हाताला कामधंदा नाही,त्यामुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली,महागाईने लोक होरपळून निघत आहेत.महावितरणचे कर्मचारी घरी जाऊन विज कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे,ग्रामीण भागातील शेतकरी,मजूर लोकांच्या घरी गेल्याबरोबर कर्मचारी आत्ताचं पैसे भरा असे धमकाऊन सांगत आहेत, विजबिल लगेच नाही भरल्यास ताबडतोब विज कनेक्शन तोडून टाकत आहेत.आत्ता वेळेवर कोणाच्याच जवळ थोडेच घरी पैसे असणार आहेत,एखाद्या अधिकारी यांच्या जवळ तरी वेळेवर खिशातून पैसे निघतील का हा एक प्रश्न येथे उपस्थित होतो. एक कींवा दोन दिवसाला नक्की विजबिल भरीन असे ग्राहक सांगत आहेत,पैसै दोन दिवसात नाही भरले तर विज कनेक्शन तोडा असे ग्राहक म्हणत आहेत तरी महावितरण ने भारतीय लोकशाही मध्ये हुकुमशाही करीत आहेत, महावितरणला कोणाचाच धाक राहीला नाही,विजबील वाढऊन देणे,विजेने ऊस जळून खाक होणे,ग्राहकांना ऊद्धट वागणूक देणे यांचे हे नित्याचेच झाले आहेत, अधिकारी वर्ग हप्त्यातून एकदा आँफीसला येतात.विज तोडलेल्या एखाद्या घरात कदाचित जिवित हानी झाली तर कोट्यवधी रूपये आम्ही भरपाई त्या व्यक्तीस देऊ असे एका अधिकारी यांनी मोबाईलवर सांगितले.म्हणजे मनुष्यापेक्षा पैशाला यांच्याजवळ कींमत आहे,व्यक्ती म्हणजे यांच्या नजरेत कचरा आहे.वर्तमान पत्रातून कितीही बातम्या प्रकाशित झाल्या तरी यांच्यावर काहीही परीणाम होत नाही याचे मुख्य कारण म्हणजे हे पैसा देऊन झालेले नुकसान आम्ही देऊ असे सांगतात,पवनचक्की किंवा सौर ऊर्जा द्वारे विज सगळीकडे करण्याचा शासनाचा मानसं आहे,ती विज ग्राहकांना मिळाली तर महावितरण ला कुलूप लागण्यास वेळ लागणार नाही,महावितरणचे कर्मचारी एक पिढी जगतील तर त्यांची येणारी पिढी अंधारात असेल,कारण आत्ता ते ग्राहकांना अंधारात ठेवत आहेत.महामंडळ कर्मचारी आज परेशान आहेत,तसंचं महावितरण सुद्धा एकदा अडचणीत येणार यात शंका नाही. लोकप्रतिनिधींनी सुद्धा मतदार संघातील जनतेच्या अशा समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.शेतकर्यांच्या डोक्यावर शासनाचे दहा दहा वर्षापासून शेती कर्ज असते,पण सरकार कधी त्यांचा सातबारा जप्त करीत नाही,ऊलट पुनर्गठन सारख्या योजना अंमलात आणल्या जातात.लाईनमन गावातील खाजगी व्यक्तीला विज तोडण्यास व जोडण्यास सांगून ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे वसूल करुन संध्याकाळच्या चहाची व्यवस्था करतात.मोठमोठे कारखाने,ऊद्योग कंपनी यांच्यावर अब्जावधी रूपयाची विजबिल थकीत असते,तेव्हा यांचे विज कनेक्शन का तोडले जात नाही, विज तोडल्याने एखादा कारखाना अथवा कंपनी बंद पडलेला दिसतो का?महावितरण च्या अशा हिटलरशाही धोरणांमुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!