श्री नगरेश्वर मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त श्रीकृष्ण जन्म अष्टमी उत्साहात साजरी.
श्री नगरेश्वर मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त श्रीकृष्ण जन्म अष्टमी उत्साहात साजरी
लोहा,(प्रतिनिधी)
लोहा शहरातील श्री नगरेश्वर मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आज दि.६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्म अष्टमी अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्यात श्री नागेश्वर मंदिर येथे महिन्यातील ३० दिवस प्रदोष पूजा दररोज नित्यनेमाने होत आहे. श्रावण मासानिमित्त होत असलेल्या सर्व कार्यक्रमास आर्य वैश्य समाजातील महिला भगिनींचा अन्य समाजातील महिलांचा मोठा प्रतिसाद होता.दि.६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्म अष्टमी निमित्त विविध कार्यक्रम घेवून अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.
नगरेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त तीस दिवस दररोज पूजा होत आहे. महिला भगिनी नऊवार लुगडे नेसून विविध कार्यक्रमात मोठा प्रतिसाद देत आहेत. सदरील कार्यक्रमाचे आयोजन नगरेश्वर मंदिर समिती कडून केलेले आहे.वामन महाराज पालमकर, सखाराम महाराज पालमकर,कृष्णागुरू धानोरकर,पुजा अर्चा करत परिश्रम घेत आहेत.
आर्य वैश्य समाज बांधवांचे व सर्व उपस्थित भक्त गणांचे आभार समितीचे अध्यक्ष दिनेश तेललवार, महिला मंडळाचे अध्यक्ष मंदाताई बंडेवार यांनी आभार मानले.