सोनु खतीब तेलंगणातील निर्मल क्षेत्र पर्यवेक्षक पदी नियुक्ती.
सोनु खतीब तेलंगणातील निर्मल क्षेत्र पर्यवेक्षक पदी नियुक्ती
उमरखेड : –
तेलंगणा राज्यातील निवडणूकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश संपादन करण्याच्या उद्देशाने काँग्रेस नेते तथा तेलंगणा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सोनु खतीब यांची निर्मल विधानसभा क्षेत्रातील उमेदवाराच्या प्रचारार्थ पर्यवेक्षक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र दि 8 नोव्हेंबर रोजी त्यांना प्राप्त झाले आहे .
निर्मल विधानसभा निवडणूकीत काँग्रेस उमेदवाराचा प्रभावीपणे प्रचार करून काँग्रेस नेतृत्वाला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी पक्ष नेतृत्वाने सोपविलेली जबाबदारी सोनु खतीब हे आपल्या अनुभवानुसार पार पाडतील या करिता नियुक्ती ठिकाणी तत्काळ रवाना व्हावे असा विश्वास तेलंगणा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिलेल्या पत्राव्दारे व्यक्त केला आहे .