मणिपूर हिंसा थांबवा! पुरोगामी युवा ब्रिगेड चा उमरखेड शहरात कँडल मार्च.
मणिपूर हिंसा थांबवा!
पुरोगामी युवा ब्रिगेड चा उमरखेड शहरात कँडल मार्च
उमरखेड /प्रतिनिधी :
मागील जवळपास दोन महिन्यांपासून माणिपूर या राज्यात हिंसा सुरु असून ती थांबवावी व तेथील महिलांवर होणाऱ्या अत्याचारच्या निषेधार्थ पुरोगामी युवा ब्रिगेड ने उमरखेड शहरात कँडल मार्च काढत निषेध व्यक्त केला.
माणिपूर येथील हिंसेदरम्यान एक विडिओ वायरल झाला असून यामध्ये काही लोक दोन स्त्रियांची नग्न अवस्थेत थिंड काढत होते. ही घटना संताप जनक असून या घटनेचा निषेध करण्यासाठी पुरोगामी युवा ब्रिगेड तर्फे पुरोगामी कार्यालयापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत कँडल मार्च काढण्यात आले .
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या सभेत ऍड. संतोष जैन,पुरोगामी चे प्रवक्ता शाहरुख पठाण, बि.आर. एस. पार्टी चे दामोदर इंगोले, शकील अहेमद, चंदन सावते आदींनी आपल्या भाषणात घटनेचा निषेध केला असून केंद्र सरकार ला माणिपूर हिंसा थांबविण्यासाठी व महिलांवरील वाढते अत्याचार थांबविण्याचे आवाहन केले आहे.
या कँडल मार्च मध्ये पुरोगामी युवा ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील लोखंडे, जिल्हा सचिव सागर शेरे, तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी,तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब चंद्रवंशी, तालुका उपाध्यक्ष आतिष वटाणे, आकाश माने, अमर लोमटे, उमरखेड शहर प्रभारी अंबादास गव्हाळे, शहराध्यक्ष ईरफान शेख, नागराज दिवेकर,अनिकेत ताजवे ,शहर सचिव रुपेश टिंगरे, मुक्तार शाह, शुभम जवळगावकर, दिवट पिंपरी शाखाध्यक्ष शुभम सरकाटे, दत्ता दिवेकर, सिद्धार्थ मुनेश्वर, लांबटिळे,धर्मा गायकवाड, गजानन वानखेडे, साखरे, सिराज खान, विठ्ठल कोंडामंगले, अथर खतीब, जमीर सय्यद, अस्लम शेख, ख्वाजा शेख, इरफान, आदी उपस्थित होते.