शिवप्रभा ट्रस्टतर्फे ढाणकी कोविड सेंटरला दीड लाखापेक्षा जास्त मदतीचा हात.

youtube

शिवप्रभा ट्रस्टतर्फे ढाणकी कोविड केअर सेंटरला दीडलाखापेक्षा जास्त मदतीचा हात

ढाणकी….सविता चंंद्रे
अमोल साईनवार, परशराम नरवाडे व टीमचा ढाणकीच्या प्राणवायु चळवळीस भक्कम पाठिंबा.
नागेश मिराशे व सोहम नरवाडे हे युवक ठरलेत ढाणकीसाठी ‘ओक्सीजनदुत ढाणकी येथे पत्रकार बांधवाच्या प्रेरणेनेला साद देत शिक्षक बांधवांनी व स्थानिक दानशूरांनी केलेल्या मदतीतुन नुकतेच ३० खाटांच्या कोवीड केअर सेंटरचे यशस्वी लोकार्पण झाले आहे. ह्यांच्या मानवीय कार्याला बळकटी यावी ह्यासाठी व ढाणकीसह पैनगंगा अभयारण्याच्या ३०-३५ दुर्गम खेड्यातील लोकांना कोवीड काळात ओक्सीजनची व्यवस्था व्हावी ह्या उदात्त हेतुने शिवप्रभा टिमने व शिवप्रभावर प्रेम करणाऱ्या मा देवांश मखिजा, मा मयुरीताई जोशी ढवळे ,मा सलील सातपुते या शुभचिंतकांनी तब्बल दीड लाख रुपये पेक्षा जास्त ओक्सीजन निधी म्हणुन पाठवला आहे.ढाणकीच्या इतिहासात एखाद्या संस्थेने केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मदतनिधी असल्याने चळवळीस उदंड बळ प्राप्त झाले आहे. मा अमोल साईनवार संस्थापक अध्यक्ष असलेली शिवप्रभा हे एक सामाजिक क्षेत्रात गेल्या कित्येक वर्षांपासून निस्वार्थीपणे कार्य करणारे चारिटेबल ट्रस्ट आहे. शिक्षण,महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास,आरोग्य व ध्यान ह्यासह अनेक मानवीय सत्कार्यासाठी सुमारे आठ राज्यातल्या ३७ जिल्ह्यात शिवप्रभा टीम सतत कार्यरत असते.ट्रस्टचे कार्याध्यक्ष परशराम नरवाडे असुन ते मुळ खरुस (ढाणकी)चे भूमीपुत्र असल्याने ‘आपल्या मात्रुभूमीतील माणूस जगला पाहिजे ‘ह्या सामाजिक उत्तरदायित्व भावनेने प्रेरीत होऊन सदर निधी मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केलेत.यवतमाळ जिल्हा समन्वयक सोहम नरवाडे सह सदस्य नागेश मिराशे व टिमशिवप्रभाने ह्या आधिही ढाणकी परीसरातील शैक्षणिक व सामाजिक समस्या सोडवण्यासाठी हिरारीने मदत केली आहे.
पेशाने शिक्षक असलेल्या नागेश मिराशे ह्यांनी सहकारी शिक्षकमित्रांच्या मदतीने चालवलेल्या ‘चला श्वास देऊ…’ ह्या मोहीमेतुन दोन ओक्सीजन काँन्सट्रेटर मशीन ढाणकी कोवीड केअरला ह्या अगोदर नुकत्याच प्रदान केल्या आहेत.ह्या चळवळीतही शिवप्रभा व सखा ग्रुपकडुन अकरा हजार रोख मदत केली गेली आहे हे विशेष.त्या रक्कमेसह शिक्षकांच्या व सखा ग्रुप कडून उर्वरीत निधीतुन ईन्व्हर्टरची व्यवस्था करून दिली जाणार आहे. मिराशेंनी कोवीड संक्रमणाच्या वाढत्या संसंर्ग व तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शिवप्रभा ट्रस्टकडे परशराम नरवाडे सरांच्या व सोहम नरवाडेंच्या मार्फत अधिकच्या गरजपुर्तीकरिता मदतीसाठी अहवाल पाठवून विनंती केली होती.
मा. देवांश मखिजा मा. मयुरी जोशी ढवळे व मा. सलिल सातपुते व शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट ह्यांच्या सहकार्यातुन तात्काळ उपाययोजना करत तीन लाख रुपये किमतिच्या एक ओक्सीजन काँन्सट्रेटर मशीन प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठवल्या आहेत. ह्या एक मशीनवर साधारणता चार ऋग्णांना एकाचवेळी ओक्सीजन पुरवता येउ शकतो.काल शिवप्रभा कार्याध्यक्ष श्री.परशराम नरवाडे ,सोहम नरवाडे व नागेश मिराशेंच्या हस्ते तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. किशोर कपाळे,ठाणेदार विजय चव्हाण व ओक्सीजन टिमचे ,नितीन येरावार,संजय सल्लेवाड, ब्रम्हानंद मुनेश्वर आदिंना मशीन व मास्क रितसर सुपुर्द करण्यात आले .नागेश मिराशे सोहम नरवाडे यांच्या संवेदनशील प्रयत्नातुन आतापर्यंत ढाणकी कोवीड केअरला अडीच लाख रुपयावर निधीच्या प्राणवायूची व्यवस्था झाल्याने जणु ते ढाणकी परीसरासाठी ‘ओक्सीजन दुत’ ठरल्याची सर्वत्र चर्चा आहे.
भूमीपुत्रांकडुन सामाजिक बांधिलकी जोपासत मातीचे ऋण फेडण्याच्या संवेदनशील प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!