जालना सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ ढाणकी कडकडीत बंद ढाणकी
जालना सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ ढाणकी कडकडीत बंद
ढाणकी
जालना येथील अंतरवाली सराटी येथील मराठा समाज बांधवावर पोलीस प्रशासनाने अमानुष मारहाण केल्याबाबत, सकल मराठा समाजातर्फे ढाणकी कडकडीत बंद ठेवण्यात आले.
अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर तसेच महिला भगिनीवर, बालकांवर पोलीस प्रशासनाकडून अमानुष लाठी चार्ज करण्यात आला. त्यादरम्यान अनेक मराठा तरुण जखमी झाले. हा हल्ला करण्यासाठी जबाबदारी असणारे अधिकाऱ्यांवर कारवाई करून, त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व सकल मराठा समाजाची माफी या सरकारने मागावी. तसेच मराठा आंदोलकांवरील खोटे गुन्हे दाखल केलेले तात्काळ रद्द करावे. म्हणून हा कडकडीत बंद ठेवण्यात आला.
या बंद ला शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी,मनसे, बिरसा ब्रिगेड या पक्षांचा पाठिंबा होता. सर्वप्रथम सकाळी दहा वाजता संपूर्ण गावातून मिरवणूक निघाली. तद्नंतर जुने बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे, आंदोलकांनी काही वेळ रास्ता रोको सुद्धा केला. सर्वपक्षीय नेत्यांनी आपापले विचार या ठिकाणी व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, ठाणेदार सुजाता बनसोड यांच्या नेतृत्वात, बिटरगाव पोलीस स्टेशनचा तगडा बंदोबस्त होता.