उपवर्गीकरणासाठी उमरखेडमध्ये मातंग समाजाचा एल्गार! हजारोंचा जनआक्रोश मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला; १५ सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा
उपवर्गीकरणासाठी उमरखेडमध्ये मातंग समाजाचा एल्गार!
हजारोंचा जनआक्रोश मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला; १५ सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा
उमरखेड : अनुसूचित जातींचे ‘अ, ब, क, ड’ पद्धतीने उपवर्गीकरण करून वंचित घटकांना त्यांच्या हक्काचा आरक्षणाचा लाभ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी उमरखेडमध्ये मातंग समाजाच्या वतीने बुधवारी भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार नामदेव ससाणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो समाजबांधव व भगिनी सहभागी झाले. महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत आणि महामानवांच्या प्रतिमा असलेल्या रथासह मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत उपविभागीय कार्यालयावर धडकला.
मोर्चाच्या मार्गात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा व पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महागाव रस्त्याने मोर्चा उपविभागीय कार्यालयासमोर पोहोचला. मोर्चात सहभागी झालेल्या समाजबांधवांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेतले होते. ‘उपवर्गीकरण झालेच पाहिजे’, ‘वंचितांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. मोर्चाचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते.
उपविभागीय कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करत अनुसूचित जातीतील सर्व घटकांना आरक्षणाचा समान आणि न्याय्य लाभ मिळण्यासाठी उपवर्गीकरणाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
माजी आमदार नामदेव ससाणे यांनी आपल्या भाषणात उपवर्गीकरणाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू उमरखेड असल्याचे सांगितले. वंचित समाजातील घटकांच्या विकासासाठी मातंग समाज कटिबद्ध असून, आपल्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या विकासासाठी १९८७ मध्ये बार्टीची स्थापना करण्यात आली. मात्र, सर्व घटकांना समान न्याय मिळाला असता तर मातंग समाजाला आज आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असा दावा ससाणे यांनी केला. बार्टीच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभांच्या वितरणाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
मातंग समाजासाठी स्वतंत्र संस्था उभारण्याची मागणी, लहुजी साळवे यांच्या स्मारकासाठी जागा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या कामासह समाजाच्या विविध प्रश्नांचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.
उपवर्गीकरणाच्या मागणीमागे आरएसएस किंवा भाजपचा हात असल्याचे आरोप केले जात असल्याचा उल्लेख करत ससाणे यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले. उपवर्गीकरणाची मागणी ही सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे निर्माण झालेली नसून, ती अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्यांनी अनुसूचित जातीतील विविध घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लाभ मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. आरक्षणाचा लाभ काही मोजक्या घटकांपुरता मर्यादित न राहता वंचित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपवर्गीकरण गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मातंग समाजाचे मारोतराव वाडेकर, गणपत भिसे, के. डी. पवार, धृपताबाई कांबळे, संजय कंठाळे, के. मूर्ती, डॉ. अंकुश गोतावळे, विजय रणखांब, गुणवंत काळे तसेच लहुजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी मार्गदर्शन केले.
निवेदन स्वीकारले
मोर्चात उमरखेड तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने मातंग समाजबांधव सहभागी झाले होते. महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता.
सभेचे प्रास्ताविक दत्तात्रय काळे यांनी केले. सूत्रसंचालन राजू गायकवाड व जय बनसोडे यांनी केले, तर आभार कृष्णा लामटिळे यांनी मानले.
सभेच्या शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर मातंग समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार सुभाष पाईकराव यांनी स्वीकारले.
चौकट : १५ सप्टेंबरची डेडलाईन; २९ सप्टेंबरला मुंबईत एल्गार
उपवर्गीकरणाचा प्रश्न १५ सप्टेंबरपर्यंत शासनाने मार्गी न लावल्यास २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे भव्य आंदोलन छेडून मुंबई जाम करण्याचा इशारा माजी आमदार नामदेव ससाणे यांनी यावेळी दिला. शासनाने मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.


I’ve tried a few spots lately but this one really stands out. The interface is smooth and the payouts are fair. Definitely check out bdh444 if you want a reliable place to play.
Mình thường online buổi tối và thấy cricfy cricket facts app vẫn chạy khá ổn định. TONY09-18
Really impressed with the rewards here. It feels like they actually care about the players. Highly recommend vnjw88 to anyone looking for a fair game.
Helko there, You’ve done an eexcellent job. I’ll definitly dig it annd
personalloy suggesat too mmy friends. I aam sure they’ll be benefitd fom this
wweb site. xnxx
I’ve been trying a few different platforms lately and this one really stands out. The interface is smooth and everything loads fast. Definitely worth checking out bdvb89
Quick and easy login process. I appreciate how they keep the site secure and easy to access from my mobile phone. Glad I found jljl72login.