श्रावण महिन्यानिमित्त उमरखेडमध्ये ‘सुर अभंगाचा – भाग २’ भव्य भजन स्पर्धा; ५ सप्टेंबरपर्यंत नोंदणीचे आवाहन

youtube

श्रावण महिन्यानिमित्त उमरखेडमध्ये ‘सुर अभंगाचा – भाग २’ भव्य भजन स्पर्धा; ५ सप्टेंबरपर्यंत नोंदणीचे आवाहन

 

​उमरखेड:
पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून ‘रिदम सांस्कृतिक कला मंच’ व ‘रिदम कराओके क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य एकल भजन स्पर्धेचे (‘सुर अभंगाचा – भाग २’) आयोजन करण्यात आले आहे. महागाव रोडवरील डॉ. त्र्यंबकरावजी माने यांच्या घराशेजारील रिदम कराओके क्लब येथे सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत ही स्पर्धा पार पडणार आहे.
​गायन क्षेत्रातील नवोदित व गुणी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत:
​प्रथम पारितोषिक: ₹३,००१/- (प्रायोजक: श्री प्रशांत आयाचीत, श्री गिरीश देशमुख)
​द्वितीय पारितोषिक: ₹२,००१/- (प्रायोजक: डॉ. धनंजय व्यवहारे, श्री सुरेश राठोड)
​तृतीय पारितोषिक: ₹१,००१/- (प्रायोजक: श्री दिगंबर गोविंदवार)
​उत्तेजनार्थ पारितोषिक: ₹७००/- (प्रायोजक: ॲड. संजय गंगात्रे)
​प्रोत्साहनपर पारितोषिके: प्रत्येकी ₹५००/- (प्रायोजक: श्री किशोर सारडा, श्री शिवाजी केंद्रेकर, श्री अतीश कळबांडे, श्री रामचंद्र जोगदे व श्री रवीभाऊ काळे)
​स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
​स्पर्धेची नियमावली:
​स्पर्धकांना सादरीकरणासाठी ५ मिनिटांचा वेळ दिला जाईल.
​स्पर्धेत अभंग, गवळण किंवा भक्तिगीत सादर करता येईल.
​भजन साहित्य व वादकवृंद आयोजकांतर्फे उपलब्ध केला जाईल; स्पर्धकांना स्वतःचे वादक आणण्याचीही मुभा राहील.
​प्रवेश शुल्क ₹३००/- असून शालेय विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात ₹२५०/- राहील.
​स्पर्धेबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वमान्य राहील.
​स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गायकांनी आपली नाव नोंदणी ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी ७२१९६८०५०१, नाव नोंदणीसाठी ९८६०२७४६७९ आणि फोन पे (PhonePe) द्वारे शुल्क भरण्यासाठी ९९२३७३६६२७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक संजय मुटकुळे (रिदम कराओके क्लब) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

6 thoughts on “श्रावण महिन्यानिमित्त उमरखेडमध्ये ‘सुर अभंगाचा – भाग २’ भव्य भजन स्पर्धा; ५ सप्टेंबरपर्यंत नोंदणीचे आवाहन”

  1. Finally found a site that doesn’t crash every five minutes. The interface is super user-friendly and the payouts feel fair. Highly recommend giving 65jililogin a try if you are into online gaming.

  2. Solid platform with a very professional layout. I feel safe depositing my funds here because everything looks legit and secure. I trust kv88 for my daily plays.

  3. The variety of slot titles you have listed is absolutely amazing and keeps me coming back every single day. I appreciate the fair gameplay mechanics and how quickly they handle any account questions. It feels like a trustworthy community where everyone enjoys the game fairly. 777slotgame

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!