स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मेडीयम स्कुल दहागाव तालुकास्तरीय झांकी प्रदर्शनात द्वितीय
स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मेडीयम स्कुल दहागाव तालुकास्तरीय झांकी प्रदर्शनात द्वितीय
उमरखेड –
इतिहासाच्या पानावर,रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारे राजे म्हणजे शिव छत्रपती होत. आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी उमरखेड येथील शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विविध स्पर्धापैकी झांकी स्पर्धेत उमरखेड येथील स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मेडीयम स्कुल दहागाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकाविला.
यामध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध वेशभूषा साकारली तसेच शिवजन्मोस्तव, सवंगड्यासोबत खेळ, रायरेश्वराची प्रतिज्ञा, अफझल खानाचा वध, शिवराज्याभिषेक सोहळा, इत्यादी देखावे सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवत तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळविला.
यावेळी शाळेचे व्यवस्थापक आशिष लासीनकर, मुख्याध्यापक एम.पी. कदम, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विकास डोळस, अविनाश घुसे, पल्लवी पराते व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
यशस्वीतेकरिता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी प्रयत्न केले.
This gateway is fabulous. The splendid substance displays the essayist’s commitment. I’m overwhelmed and envision more such astonishing presents.