डॉ .जाकीर हुसेन वार्डातील 72 वर्षे जुनी जिवघेणी 11 केव्ही विद्युत वाहिनी काढण्यात यश आजवर दोघांचे बळी घेतले युवा काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष सोनु खतीब यांचा पाठपुरावा.
डॉ .जाकीर हुसेन वार्डातील 72 वर्षे जुनी जिवघेणी 11 केव्ही विद्युत वाहिनी काढण्यात यश
आजवर दोघांचे बळी घेतले
युवा काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष सोनु खतीब यांचा पाठपुरावा
उमरखेड : –
स्थानिक ढाणकी रोडवरील डॉ. जाकीर हुसेन वार्डातील अनेक नागरिकांच्या घरांवरून जाणारी 72 वर्षे जुनी हाय होल्टेज 11 केव्ही विद्युत वाहिनी स्थानिक नागरिकांच्या मागणी वरून अखेर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सोनु खतीब यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्या वरून विद्युत कंपनीने मुख्य रस्त्यावरून वळविण्यात आल्याने आतापर्यंत 2 जणांचा बळी घेणारी विद्युत वाहिनी नागरिकांच्या घरावरून काढण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे .
शहरातील ढाणकी रोडवरील डॉ जाकीर हुसेन वार्डातील शेकडो नागरिकांच्या घरावरून टाकण्यात आलेली सुमारे 72 वर्षा पासून जुनी असलेली 11 केव्ही हाय होल्टेज विद्युत वाहिनी स्थानिक नागरिकांसाठी जिवघेणी समस्या बनली होती . घर दुरुस्ती करीता घरावर गेलेल्या 3 नागरिकांना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचे जीव गेले होते . घरांवरून काढण्यात आलेल्या या अती उच्च दाबाच्या विदयुत वाहिनीमुळे स्थानिक नागरिक सदैव भयभित होते . याबाबत स्थानिक रहिवाश्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे याकरिता सोनु खतीब नईम भाई यांनी आमदार वजाहत मिर्झा , प्रदेश काँग्रेस महासचिव तातु देशमुख, युवा नेते गोपाल अग्रवाल राम देवसरकर यांच्या मार्गदर्शनातून विद्युत कंपनीचे वरिष्ठ , जिल्हा नियोजन समिती , उर्जा मंत्रालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला . त्यांच्या या प्रदिर्घ पाठपुराव्याला अखेर यश प्राप्त झाले असून दि . 9 ऑक्टोंबर 2023 रोजी विद्युत कंपनीने नागरिकांच्या घरांवरून जाणारी विद्युत वाहिनी हटवून मुख्य रस्त्यावर वळविली त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला . सोनु खतीब यांच्या सोबत वार्डातील रहिवाशी नईम पायलट , मुजीब नेता , जीया खतीब, मुजाहिद खतीब , माजी सैनिक शेख कय्यूम , ताहेर भाई, मजीद ठेकेदार , शेख अनवर ड्रायव्हर , नजीब आतारी , शेख फारुख , शेख सद्दाम शेख मुजीब ड्राइव्हर यांनी अथक परिश्रम घेतले .
“ चौकट ”
आमच्या घरांवरून गेलेल्या 11 केव्ही हाय व्होल्टेज विद्युत वाहिनीमुळे पावसाळ्यात टिनपत्रे दुरुस्तीसाठी आम्हाला आमच्या घरांवर जिवांवर उदार होऊन जावे लागत होते . स्थानिक विदयुत कंपनीकडे वारंवार व्यथा मांडूनही काही उपयोग होत नव्हता . सोनु खतीब यांनी ही विदयुत वाहीनी मुख्य रस्त्यानेच वळविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर जोरदार प्रयत्न केल्याने आमची जिवघेणी समस्या सुटल्याचे आज आम्हाला समाधान लाभले आहे .
– शेख कय्यूम
माजी सैनिक , रहिवाशी डॉ जाकीर हुसेन वार्ड उमरखेड
चौकट
मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली 11 के व्ही विद्युत वाहिनी ही काँगेसचे युवा नेते सोनू खतीब यांनी कुठल्याही पदाची लालसा न ठेवता अवघ्या एका महिन्यात जीवघेणी विद्युत वाहिनी काढून नागरिकांना दिलासा दिला
स्थानिक नागरिक
मुजीब नेता