पिकाचा सर्वे करून सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या – काँग्रेसची जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी.
पिकाचा सर्वे करून सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या
[काँग्रेसची जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी ]
उमरखेड:
तालुक्यात झालेल्या संततधार पावसाने अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीला आलेल्या महापुरामूळे थैमान घातल्याने शेतजमिनीचा नुकसान झाल्याने पिकाचा सर्व्हे करून सरसकट हेक्टरी ५०,००० / – रूपये मदत दया अशी मागणी उपविभागीय अधिकारी कार्यालय मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दि २२ जुलै रोजी निवेदनातून काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली .
तालुक्यात दि . १३ व १४ जुलै रोजी झालेल्या अतिपावसामुळे पिकाचे व शेतजमिनीचे पुर्णतः नुकसान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करणे बाबत .
उमरखेड तालुक्यात सरासरी पेक्षा दुप्पट पाऊस झाल्यामुळे झालेल्या नुकसानीचा शेतजमिनीचा व पिकाचा नुकसाने बाबत सरसकट सर्व्हे करून हेक्टरी ५०,००० / रूपये ते १,००,००० / – रूपये पर्यंत मदत देण्यात यावी तसेच
तालुक्याती अतिपावसामुळे रस्त्याचे पुर्णतः नुकसान झाले असून व कमी उंचीच्या पुलामुळे वाहतुक बंद पडल्यामुळे पुलाची उंची वाढवून रस्ते दुरुस्ती करणे
व तालुक्यातील पेरण्या उशीरा झाल्यामुळे पिके लहान अवस्थेत असतांना पाण्याने वाहून गेल्यामुळे शेतीसाठी घेतलेले पीक कर्ज माफ करणे ,शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे इलेक्ट्रीक बिल माफ करणे , शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यामुळे पिकाचे व जिवीत्वाचे झालेले नुकसान भरपाई देणे ,
अशा विविध मागण्यासह तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी माजी आमदार विजयराव खडसे, प्रदेश सरचिटणीस तातू देशमुख, तालुका अध्यक्ष दत्तराव शिंदे, गोपाल शेठ अग्रवाल, बाळासाहेब चंद्र, सुधाकर लाहेवार, वासिम पठाण, अशोक चौरे, सिद्धू जगताप, भैय्या पवार, कल्याणराव राणे, विवेक मुडे, मधुकर फटिंग, निरंजन राठोड, सुलेमान गुरु, नवल कलोशी, मोहन मगरे, अवधूत खडपकर, नागेश पांडे, दीपक सुरोशे, मंचागराव चव्हाण, राहुल काळबांडे, अजय पाईकराव, गजानन सूर्यवंशी, किशोर तिवारी, बळू अण्णा दुर्गमवार, प्रवीण देशपांडे, अनंतराव कदम, शिवाजी वानखेडे, राहुल वानखेडे, सुनील चेके,गणेश रावते, वीरेंद्र खंदारे, अजहरअहमद,
विकी धामणे, विशाल कोत्तेवार, आकाश श्रीवास्तव,
इत्यादी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Thank you very much for sharing, I learned a lot from your article. Very cool. Thanks. nimabi