पोफाळीत एकाच रात्री चार घरी धाडसी चोर्या.
पोफाळीत एकाच रात्री चार घरी धाडसी चोर्या
पोलीसाना पेट्रोलिगचा पडला विसर
उमरखेड प्रतिनिधि :- पोफाळी पोलिस स्टेशन च्या एक कि.मी.अतरावर असलेल्या पोफाळीत १७/ ५/२०२३ बुधवारच्या रात्रीला गावातील प्रतिष्ठीत नागरीक पोलीस पाटील माधव गुंढारे यांच्या घरी चोरट्याने धाडसी दरोडा टाकुन सात तोळे सोन्याचे दहा तोळे चांदी असे दागिने रोख रक्कम ६०,००० रु असे एकुण ५ ते ६ लाख रू. मुद्दे माल चोरट्याने लपास केला .तसेच गणेश ढोणे यांच्या घरीतुन सुध्दा चोरट्याने ४ तोळे सोने व दोन अंगठ्या व रोख रक्कमे वर हाथ साफ केला. पोलीस पाटील यांच्या घरा शेजारी असणार्या बबन शेळके ह्याच्या घरातुन सहा हजाराच्या रोख रक्कमेवर हातसाफ केला.अजीज पठाण यांंच्या मुली २५ मे ला लग्न असल्यामुळे त्याच्या घरी जास्त घबाड मिळण्याच्या आशेने घराचा दरवाजा उचलुन आता मध्ये शिरले मात्र त्याच्या हाती काहीच लागले नाही. सर्व चोरीच्या घटनाची पोफाळी पोलीस स्टेशनला कळविले असता. पोफाळी पोलीसाने पाहणी केली असता यवतमाळ वरुन श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असता. श्वान पथकाच्या हाती कोणताच धागादोरा लागला नाही.पोफाळी पोलिस रात्रीची पेट्रोलिंग चा विसरपडल्यामुळे पोलीस स्टेशनला तक्रारार देण्यात आली असुन ठाणेदार राजीव हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरक्षक राजेश पंडित ,संजय मुळे,संतोष काबळे,राहुल मडावी व त्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे ..पोफाळी पोलिस पेट्रोलिंग चा विसरपडल्या चे बोलले जात आहे.त्यामुळे परिसरातीली चोर्याचे प्रमाण वाढल्या परीसरात लोका मध्पे भितीची वातावरण पसरले आहे.