विद्यार्थी लाभाच्या 35 सेवेचे फलक प्रत्येक विद्यालयात लावणे बंधनकारक – शिक्षणअधिकारी डॉ.जयश्री राऊत.

youtube

विद्यार्थी लाभाच्या ३५ सेवेचा फलक प्रत्येक विद्यालयात लावणे बंधन कारकक -शिक्षणअधिकारी  डॉ. जयश्री राऊत 

उमरखेड …
गो.सी.गावंडे महाविद्यालयात सर्व प्राचार्य / मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक खाजगी शाळा, आश्रम शाळा, इंग्लिश मीडियम स्कूल व स्वयं अर्थ सहाय्य शाळा व जिल्हा परिषद शाळा पुसद, उमरखेड, महागाव यांची सभा जि. प. शिक्षण विभाग माध्यमिक यांनी आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ जयश्री राऊत मॅडम प्रमुख अतिथी म्हणून रामसाहेब देवसरकर (अध्यक्ष य. जी. अ. कुणबी समाज यवतमाळ) डॉ यादवरावजी राऊत (सचिव) गटशिक्षणाधिकारी पांडुरंगजी खांडरे साहेब , पुसद व महागाव चे प्रभारी गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने डॉ जयश्री राऊत यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या हस्ते करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ जयश्री राऊत मॅडम यांनी लोकसेवा हक्क अध्यादेशानुसार राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक कार्यक्षम व समयोचित तत्पर व दर्जेदार लोकसेवादेण्याकरिता १ मे २०२२ पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यासंदर्भात अधिसूचना दिल्या. सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक ,उच्च प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी लाभाच्या ३५ सेवा संबंधित डिजिटल बोर्ड प्रत्येक शाळेत लावावे असे सांगितले.
सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन आर डी शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद देशमुख यांनी केले कार्यक्रमाला विस्तार अधिकारी अनिल शेंडगे साहेब हे प्रामुख्याने हजर होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉलेजमधील सर्व प्राध्यापक मंडळींनी अथक परिश्रम घेतले.

Google Ad
Google Ad

1 thought on “विद्यार्थी लाभाच्या 35 सेवेचे फलक प्रत्येक विद्यालयात लावणे बंधनकारक – शिक्षणअधिकारी डॉ.जयश्री राऊत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!