डाॅ.आनंदीबाई जोशी यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महिलांनी कार्य करावे — नगरसेविका सौ. गोदावरीताई गजानन सूर्यवंशी.
डाॅ.आनंदीबाई जोशी यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महिलांनी कार्य करावे — नगरसेविका सौ. गोदावरीताई गजानन सूर्यवंशी
लोहा /प्रतिनिधी
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा आदर्श घेऊन महिलांनी कार्य करावे असे प्रतिपादन लोहा न. पा.च्या नगरसेविका सौ. गोदावरीताई गजानन सुर्यवंशी यांनी केले.
लोहा येथे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत
लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात महिलांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या सुविदय पत्नी लोहा न.प. च्या नगरसेविका सौ. गोदावरीताई गजानन सुर्यवंशी या मार्गदर्शन करीत होत्या.
यावेळी पुढे बोलताना नगरसेविका सौ. गोदावरीताई गजानन सुर्यवंशी म्हणाल्या की,
डाॅ.आनंदीबाई जोशी यांनी महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम वैदयकीय क्षेत्रात शिक्षण घेतले पहिल्या महिला डॉक्टर बनल्या आणि महिलांच्या आरोग्यासाठी त्यांनी आरोग्य शिबीर घेतले यातून महिलांमध्ये आरोग्याची जनजागृती केली महिलांसाठी त्यांचे कार्य मौल्यवान ठरले त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महिलांनी कार्य करावे आपले जीवनमान उंचावण्यासाठी निरोगी राहण्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करावी व महिलांनी आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात असे आवाहन नगरसेविका सौ गीदावरीताई गजानन सूर्यवंशी यांनी केले .
आझादी का अमृत महोत्सव व रक्षाबंधन या सणाचे औचीत्य
साधून डाॅ. आनंदी बाई जोशी आरोग्य तपासनी शिबीराचे
आयोजन करण्यांत आले होते.
या शिबिराचे आयोजन
जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. भोसीकर व NCD नोडल अधिकारी डॉ. हणमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय अधिक्षक डाॅ. बारी यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे संपन्न झाले .
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका सौ . गोदावरीताई गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले.
यावेळी गंगाधर सावकार सूर्यवंशी , सौ सुप्रिया सचिन सूर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरील शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बारी यांनी भूषविले.
या आरोग्य शिबीर मोहिमेत 16 ऑगस्ट 2023 ते . 31 ऑगस्ट 2023 पर्यंत लोहा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
सदरील शिबीराची सुरवात त्यांच्या आरोग्य तपासण्या करून करण्यात आली. यावेळी डॉ पानझडे मॅडम ,डॉ. प्रशांत जाधव ,डॉ. रूबी मॅडम, डॉ.दिपक मोटे , डॉ. दिनेश राठोड ,डॉ लोहारे , डॉ शारेखा मॅडम
RBSK महिला वैद्यकीय अधिकारी
डॉ. देशपांडे मॅडम,
इंचार्ज सिस्टर
सौ. स्वामी सिस्टर, गजलवार सिस्टर,
सौ. सोनटक्के सिस्टर, व
NCD समुपदेशक
श्रीमती पेनलोड मॅडम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्ताविक डॉ. रुबी मॅडम यांनी केली.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर बसवेश्वर लोहारे यांनी केले व आभार डॉक्टर दिपक मोटे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.