तहशील कार्यलय ही माझी कर्मभुमी आहे -आमदार नामदेव ससाने

youtube

तहशील कार्यलय ही माझी कर्मभुमी आहे -आमदार नामदेव ससाने

प्रतिनिधी
उमरखेड :

उमरखेड विधानसभेचा परिसर पाहता सामान्य नागरिकांना उपयोगी कार्यालय असो अथवा तालुका स्तरावरील कार्यालय असो तिथे येण्यासाठी ७० किलोमीटर अंतरावरून एसटीत बसून प्रवास करावा लागत होता . त्यातल्या त्यात सामान्य नागरिकांना एकाच वेळी तहसील , पंचायत समिती व कृषी कार्यालय अथवा इतर कार्यालयात जाऊन आपली कामे आटोपून त्यांना तत्पर परत बसने गावी परतावे लागत होते .अशातच त्यांचा दिवस हा संपूर्ण कामांमध्ये व्यस्त होत होता . आता यापुढे प्रशासकीय इमारत झाल्यानंतर अवघ्या तासभरातच सर्वच कार्यालयातील कामे आटोपून त्यांना परत गावी जाण्यासाठी सोयीस्कर होणार आहे . त्यामुळे प्रशासकीय इमारत ही नागरिकांना सेवा देणारी ठरणार आहे असे प्रतिपादन आमदार नामदेव ससाने यांनी केले .
स्थानिक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी गाडे , प्रभारी तहसीलदार वैभव पवार , ,उपविभागीय अभियंता प्रमोद दूधे हे उपस्थित होते .
आमदार नामदेव ससाने म्हणाले की , तहसील कार्यालय ही माझी कर्मभूमी आहे . त्यामुळे येथील अडीअडचणी माहीत होत्या . उमरखेडला माझ्या बंदी भागातील नागरिकांना ७०ते ८० किलोमीटरवरून येवुन अक्षरशः दिवस गमवावा लागत होता . त्यांचा एक दिवस प्रत्यक्ष कामांमध्ये जात होता . त्यांची सगळी कामे एकाच इमारती व्हावी हा मानस आमदार होण्याअगोदर पासून माझा होता . त्यामुळे पंधरा कोटीची प्रशासकीय इमारत इथे मिळण्यासाठी मी प्रयत्न केले आज रोजी शासकीय कार्यालयाच्या इमारती ह्या भाड्याने शहरात सर्व दूर आहेत . त्यामुळे एक तर सरकारी खर्चाचा दुरउपयोग होत होता . दुसरे नागरिकांना त्रासही सहन करावा लागत होता . त्यामुळे आता या इमारतीचे भूमिपूजन झाले असून येत्या वर्षभरात इमारत उमरखेड विधानसभेतील लोकांच्या सेवेत रुजू होणार आहे इथे जवळपास सर्वच शासकीय कार्यालयाची स्थापना होईल त्यामुळे नागरिकांचा मूळ प्रश्न हा सुटणार आहे असे बोलताना आमदार नामदेव ससाने म्हणाले की उमरखेड नगरपालिकेच्या माध्यमातून अभ्यासिका , डॉक्टर बाबासाहेब वाचनालय ,उमरखेड -गावंडे महाविद्यालय रस्ता पुसद ते उमरखेड दोनशे कोटीचा रस्ता ,उमरखेड – ढाणकी रस्ता , ह्यासोबतच ग्रामीणदोनशे कोटीचा रस्ता ,उमरखेड – ढाणकी रस्ता , ह्यासोबतच ग्रामीण भागातील रस्ते याचे जाळे पूर्णपणे वाहिले आहे .त्यामुळे भविष्यात रस्ते तालुक्यातील उत्तम दर्जाचे होणार आहे . विधानसभेत जवळपास एक हजार कोटी रुपयांचा कार्यक्रम या येत्या तीन महिन्यात पार पडणार आहे . त्यामुळे .नागरिकांच्या आरोग्य तसेच रस्ते तसेच सामान्य प्रश्न यांचा प्रश्न निश्चितच येत्या काळात सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना नितीन भुतडा म्हणाले की ,एकाच इमारतीतून सर्व कार्यालयाची कामे होणार असल्याने पंधरा कोटीच्या या इमारतीतून आम्ही उमरखेड परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहे . तसेच नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचाही विचार केला आहे .एवढेच नव्हे तर उमरखेड शहरात पोलीस ठाण्याची इमारत , रेस्ट हाऊस यासोबतच उमरखेड शहराच्या विकासासाठी ४० कोटी रुपयांचा निधी आताच प्राप्त केला आहे .या ४०कोटी रुपयांच्या निधीमधून शहरातील सर्व अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरण येत्या तीन महिन्यात सुरु होणार असून शहरात आज रोजी १४१ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगितले .
सुनासंचालन भाजपा शहरअध्यक्ष प्रकाश दुधेवार यांनी तर आभार प्रदर्शन श्रीधर देवसरकर यांनी मानले .

Google Ad
Google Ad

1 thought on “तहशील कार्यलय ही माझी कर्मभुमी आहे -आमदार नामदेव ससाने

  1. I have read some excellent stuff here Definitely value bookmarking for revisiting I wonder how much effort you put to make the sort of excellent informative website

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!