उमरखेड नगरपालिका उपाध्यक्षपदी जुबेर कुरेशी स्वीकृत सदस्यपदी अविनाश अग्रवाल । बाळासाहेब नाईक । विजय गुजरे यांची निवड : उमरखेड :
उमरखेड नगरपालिका उपाध्यक्षपदी जुबेर कुरेशी
स्वीकृत सदस्यपदी अविनाश अग्रवाल । बाळासाहेब नाईक । विजय गुजरे यांची निवड :
उमरखेड :
येथील नगरपालिका उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची आज दिनांक १६ जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी जनशक्ती पॅनलचे जुबेर कुरेशी तर स्वीकृत सदस्य पदी अविनाश अग्रवाल व बाळासाहेब नाईक यांची तर भाजपाकडून विजय गुजरे यांची निवड स्विकृत सदस्य म्हणून करण्यात आली आहे.
नगरपालिकेत जनशक्ती पॅनल कडून तेजश्री जैन या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या तर २६ पैकी तब्बल १८ नगरसेवक हे जनशक्ती पॅनलचे निवडून आले आहे . भाजपाचे ९ नगरसेवक निवडून आलेले आहेत असे संख्याबळ असतांना दोन स्वीकृत सदस्य हे जनशक्ती पॅनल कडून जाणार होते तर एक स्वीकृत सदस्य भाजपाकडून जाणार होता .आज झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनशक्ती पॅनल कडून जुबेर कुरेशी यांनी तर भाजपाकडून अमोल तीवरंगकर यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले होते .त्यामध्ये १८ विरुद्ध ९ मताच्या फरकेने जुबेर कुरेशी हे उपाध्यक्षपदी विराजमान झाले . यावेळी स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली यामध्ये अविनाश अग्रवाल , बाळासाहेब नाईक व विजय गुजरे यांची निवड करण्यात आली आहे .
पिठासीन अधिकारी म्हणून नगर अध्यक्ष तेजश्री जैन व मुख्याधिकारी अजय कुरवाडे हे उपस्थित होते .


I’ve been trying a few sites lately and this one is actually smooth. The payouts are fast and the interface is easy to navigate. Definitely check out phwin25ph if you want a hassle-free experience.