मुलाने वडिलांच्या डोक्यावर लाकडी काठिने वार करून केले जखमी-दराटी

youtube

मुलाने वडिलांच्या डोक्यावर लाकडी काठीने वार करून केले जखमी-दाराटी येथील घटना पोलिसांत गुन्हा नोंद.

उमरखेड(प्रतिनिधी)
दि.4_ऑगस्ट

उमरखेड तालुक्यातील दराटी येथील पोटच्या मुलाने आपल्या वडीलाला लाकडी काठीने डोक्यावर वार करून जखमी केल्याची घटना दि 3 जुलै रोजी दराटी गावात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार उमरखेड तालुक्यातील दराटी येथील सदानंद आनंदा चांदणकर वय वर्ष 28 रा दराटी यांनी घरगुती कारणावरून वाद करून आपल्या वडीलाला शिवीगाळ केली व लाकडी काठीने डोक्यावर पाठीवर मारून वडीलाला जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी मुलाचे वडील आनंदा माधव चांदणकर वय वर्ष 50 रा दराटी यांनी दराटी पोलीस स्टेशन गाठून आपल्या मुलाबद्दल तक्रार नोंदविली असता पोलिसांनी सदर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला असल्याची माहिती आज दि 4 ऑगष्ट रोजी पोलिसांकडून देण्यात आली आहे,घटनेचा पुढील तपास दाराठी पोलीस स्टेशन करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!