शिक्षकांसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात भरला वर्ग रिक्त पदे भरून शिक्षक देण्याची केली मागणी.

शिक्षकांसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात भरला वर्ग
रिक्त पदे भरून शिक्षक देण्याची केली मागणी
उमरखेड प्रतिनिधी :-
येथील नगरपरिषद अधिनस्त असलेल्या विविध उर्दू हायस्कूल वर शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अदान्तरी होत असल्याचे कारण समोर करत आज दि 7 ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद उमरखेड यांच्या दालनातच विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी वर्ग भरल्यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती.
शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून गेल्या दोन महिन्यात काही विषयांचे एकही वर्ग व्यवस्थित सुरु न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होत होते यामुळे पालकांनी शुक्रवार दि 4 ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी महेश कुमार जामनेर यांना भेटून शिक्षक देण्याची विनंती केली होती मुख्याधिकारी यांनी सोमवारी कोणत्याही परिस्थितीत आपल्या शाळेमध्ये शिक्षक नियुक्ती करून वर्ग नियमित सुरू होतील याची ग्वाही दिली होती पण आज सोमवार रोजी एकही शिक्षक हजार न झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी आपला मोर्चा मुख्याधिकारी कार्यालयाकडे वळविला पण मुख्याधिकारी हजर नसल्यामुळे त्यांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या दालनातच विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले होते प्रशासनाने त्वरित ज्या शिक्षकांची नियुक्ती केली होती त्या शिक्षकांना कार्यालयात बोलवून तोडगा काढण्याची मध्यस्थी केली दरम्यान या कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली होती त्यांना मानधनावर काम करणे परवडत नसल्यामुळे त्यांनी मानधन वाढवून देण्याची विनंती केली यातून काही तोडगा नक्कीच काढण्यात येईल अशी ग्वाही प्रशासनाच्या वतीने कार्यालय अधीक्षक नागेश बावलगावे यांनी दिल्याने शिक्षक आजच शाळेवर रुजू होऊन अध्यापनाचे काम करतील असे शिक्षकांनी सांगितल्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी समाधान व्यक्त करत आंदोलन मागे घेतले.
विद्यार्थी व पालकांच्या या आंदोलनाला युवक काँग्रेसने पाठिंबा दिला होता यावेळी सोनू खतीब , बाबुभाई हिना, सय्यद तालीब ,सय्यद इर्शाद, जम्मू पेंटर , दर्शन भंडारी, प्रवीण देशपांडे, तौकीर अहेमद, बाबु ठेकेदार ईश्वर गोस्वामी यांच्यासह अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.