महामार्गाचा शहरातून जाणारा रस्ता होणार शंभर फुटाचाच- जिल्हाधिकारी यांनी सुनावले संबंधितांना खडे -बोल
महामार्गाचा शहरातून जाणारा रस्ता होणार शंभर फुटाचाच!
जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले संबंधितांना खडे बोल!
श्रीक्षेञ माहूर – नितीन तोडसम
माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१ (अ) रस्त्याचे काम पूर्वि प्रमाणेच १०० फुट एवढे करून मधोमध दूभाजक व नाली तय्यार करावी,सुरू असलेले काम वेगाने पूर्ण करा,या पुढे कामात कुठलीही दिरंगाई, खपवून घेतली जाणार नाही.असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गाच्या संबंधित लोकांना चांगलेच खडे बोल सुनावले.
आज दिनांक ३ शुक्रवार रोजी किनवट येथे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,आमदार भीमराव केराम, माजी आमदार प्रदीप नाईक,माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी,सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता साहुत्रे यांच्या सह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये महामार्ग विभागाच्या अधिकारी आणि गुत्तेदारा सोबत बैठक घेण्यात आली.
मागील सहा महिन्यां पासून महामार्गाच्या कामाचा दर्जा व अंदाजपत्रका नुसार काम होत नसल्याची ओरड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रदीप नाईक करीत होते.त्या नंतर सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती,तर माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांची भेट घेऊन तक्रारीचा पाढा वाचला होता.आज ही बैठकी दरम्यान नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी माहूर शहरात अस्तित्वात आसणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा १०० फुटाचा रस्ता महामार्ग विभागाने अकलेचे तारे तोडत चक्क ७० फुटावर आणल्याने तीर्थक्षेत्र माहूर ला भविष्यात वाहतुकीचे मोठे संकट उभे टाकणारा ठरू शकते अशी वस्तुस्थिती जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडल्या नंतर त्यांनी महामार्ग विभागाला सूचना देत ३० मीटर अर्थात १०० फुटाचा रस्ता व त्या नंतर नाली चे निर्माण करा अशा सूचना दिल्या.
चौकट...
आजी माजी आमदारांचे सुरात सुर
इस्लापुर ते धनोडा दरम्यान जगो जागी नवीन निर्माण केलेल्या रस्त्यात अर्धवट कामे झाली आहे.तर काही कामे उच – नीच ,खाली वरी अशा तऱ्हेने करण्यात आली आहे.ज्या मुळे अपघाताच्या प्रमाणत वाढ होत आहे.असे मत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी मांडले. तर विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी सुद्धा रस्त्याच्या कामातील त्रुटी चा पाढा वाचत अनेक त्रुटी व अपेक्षित काम होत नसल्याची पुष्टी जोडल्याने विकास कामात आजी माजी आमदारांचा सुरात सूर दिसून आला.जिल्हाधिकारी यांनी ही आजी व माजी आमदाराच्या तक्रारी चा अनुभव किनवट ला येताना मला सुद्धा आला असे सांगत अमादरांच्या तक्रारी म्हणजेच जनतेच्या तक्रारी आहे,या कडे लक्ष द्या,अशा सूचना महामार्ग विभागाला दिल्या.
चौकट….
लवकरच होणार बैठक
सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट व माहूर चे तहसीलदार,महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता साहुत्रे यांची महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणी संदर्भात बैठक होणार आहे.तेव्हा संपूर्ण तिढा सुटेल अशी अपेक्षा आहे.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.