ट्रक मधील माल चोरी करून ट्रक पेटवून दिला नांदगाव घाटात बर्निंग ट्रकचा झाला उलगडा ट्रक मालक चालकविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

youtube

ट्रक मधील माल चोरी करून ट्रक पेटवून दिला

नांदगाव घाटात बर्निंग ट्रकचा झाला उलगडा

ट्रक मालक चालकविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

उमरखेड : – ट्रक मधील २६ लाख रुपयांच्या हळद मालाची चोरी केल्यानंतर चोरी उघडकीस येऊ नये यासाठी ट्रकला आग लावली यात ट्रकसह सर्व साहित्य जळून खाक झाले याबाबत हळद व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक मालक व दोन चालक अशा तिघा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून यामुळेभुसार व्यापारामध्ये खळबळ उडाली आहे .
याबाबत वसमत येथील मदनी ट्रेडर्सचे आडत व्यापारी मोहम्मद इमरान मोहम्मद हरून यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालक सय्यद मजहर अली सय्यद नूर अली रा धनेगाव ट्रक चालक फिरदोस खान दिलावर खान रा . मिलतनगर नांदेड व चालक सोयब अख्तर रा खुदबे नगर चौरस्ता नांदेड यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अडद व्यापाऱ्याने विशाल विदर्भ रोडलाईन ट्रान्सपोर्ट धनेगाव यांच्यामार्फत ट्रक क्रमांक एम हेच 20 डी इ 2948 मध्ये 24 टन 750 किलोग्राम 495 पोते हळद दिनांक 2 मार्च रोजी कलकत्ता येथे घेऊन निघाला होता दिनांक ३ मार्च रोजी सकाळी तीन वाजता अडत व्यापाऱ्याच्या भावास ट्रक चालकाने फोनवर सांगितले की उमरखेड जवळील नांदगाव घाटात हळदीने भरलेल्या ट्रकला बॅटरी मध्ये शॉर्टसर्किट होऊन गाडीला आग लागून त्यामध्ये ट्रक व हळदीचा माल जळाला आहे यावरून आडत व्यापारी घटनास्थळावर दाखल झाले असता ट्रक मधील फक्त अडीच फुट हळदीचा माल जळतांना दिसून आला .वसमत येथे हळदीचे पोते भरले त्यावेळेस ट्रकच्या केबिनच्या वर दोन फूट माल भरलेला होता त्यामुळे सदर माल हा ट्रक मालक व चालक यांनी संगणमत करून त्यांच्याताब्यात दिलेला २४ टन मला पैकी 18 टन हळद कुठेतरी उतरून चोरी केली असून सदर ट्रक चालक व मालका विरोधात कारवाई करण्यात यावी अशा आशयाच्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी ट्रक मालक व दोन चालकाविरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय घोडेस्वार करत आहेत .
( सोबत फोटो )

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!