नगरपरिषद निवडणुकांचा प्रचार सोशल मीडियावर जोरात
नगरपरिषद निवडणुकांचा प्रचार सोशल मिडिया वर जोरात
उमरखेड – येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू असूनही सोशल मीडियावर उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. पारंपरिक प्रिंट मीडियाला आचारसंहितेचे कठोर बंधन लागू असताना, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप स्टेटस, यूट्यूब, तसेच रील्स आणि शॉर्ट व्हिडीओ यांच्या माध्यमातून अनेक उमेदवार आपले प्रचार व्हिडीओ, पोस्टर, जाहीरनामा आणि आकर्षक संदेश पोस्ट करत आहेत.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर जाहिरातीसाठी परवानगी, खर्च नोंद आणि मंजुरी आवश्यक असते. मात्र सोशल मीडियावर कोणता प्रचार अधिकृत आहे आणि कोणता वैयक्तिक, याची स्पष्ट विभागणी करणे अनेकदा अवघड ठरते. त्यामुळे काही उमेदवारांनी सोशल मीडियाला मुख्य प्रचार माध्यम म्हणून स्वीकारले आहे.
यामुळे तरुण मतदार वर्गापर्यंत लगेच पोहोचण्यास उमेदवारांना मदत होत असली तरी अनधिकृत जाहिरात आणि खर्च नोंदीबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. काही पोस्टमध्ये निवडणूक चिन्ह, पक्षाची नावे आणि घोषणाबाजी उघडपणे दिसत असून संबंधित अधिकाऱ्यांनी या घडामोडींची नोंद घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, शहरात प्रचाराची तापती लाट जाणवत असून सोशल मीडियावरून मतदारांना आवाहन, कार्यकर्त्यांचे रील्स, प्रचारसभांचे व्हिडीओ आणि समर्थनाच्या पोस्ट सतत प्रसारित केल्या जात आहेत. पारंपरिक प्रिंट मीडियाच्या तुलनेत सोशल मीडिया वेगवान, खर्च कमी व परिणामकारक असल्याने या निवडणुकीत डिजिटल मोहीम अधिक प्रभावी ठरतेय, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
उमरखेड नगरपरिषद निवडणूक काहीच दिवसांवर आली असून सोशल मीडियावरील हा डिजिटल प्रचार आगामी मतदानाच्या चित्रावर कितपत परिणाम करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.




nigeria vacation packages Every transfer was smooth and on time, which is something we really valued. https://tr.linkedin.com/in/workshoptravelshop