अखेर उलगडा झाला तो उल्कापात नव्हे इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टर च तुकडे

अखेर उलगडा झाला….तो उल्कापात नव्हे….इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे
न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेट द्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर – पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बुस्टरचेच आहेत
आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले.
दिसणार्या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही ही निश्चीत ..
हे अवषेश चंद्रपुर जिल्हयातील सिंदेवाही आणी गडचीरोलीतील मुलचेरा भागात 8 बाय 80रिंग पडल्याचे माहीत होत आहे.अशी माहिती
औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्रचे संचालक श्रीनिवास औंधकर, यांनी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून कळविले आहे.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?