चक्क १० वर्षापासून बंद असलेली बरडशेवळा येथील पोलीस चौकी अखेर लोकसहभागातून उभारली गेली पोलीस चौकी..
चक्क १० वर्षांपासून बंद असलेली बरडशेवळा येथील पोलीस चौकी अखेर लोकसहभातुन उभारली गेली पोलीस चौकी..बरडशेवळा
बरडशेवाळा …
महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून शासनाने २०११-१२ मध्ये बरडशेवाळा लाखो रुपये खर्च करून इमारतीचे बांधकाम केले. इमारत वापरात घेणे गरजेचे असताना दोन ते तीन वेळा दुरुस्ती करून ही इमारत दहा वर्षांपासून धुळखात पडुन होती. मनाठा पोलिस स्टेशनचे सह्याय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण व उपनिरीक्षक चिट्टेवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते दहिभाते यांनी ही इमारत गरजेनुसार पोलिस चौकी साठी वापरात आणण्यासाठी सोशल मीडिया च्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्ते गजानन अंनतवार कवानकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चात बगल देत लागणारा रंगरंगोटी खर्च देऊन सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला.तर पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी स्वतः योगदान देत भुमीपुत्र डॉ.मंगेश मस्के, चंद्रशेखर गिरी, वसंतराव चौधरी, गजानन मोरे, दत्तराव नाईक , विशाल शिरफुले, दिनेश दहीभाते, आनंदराव मस्के, श्रीधर मस्के, पंडित नरवाडे चेंडकांपुर , गणेशराव मस्के, फारुख पिंजारी विशाल कदम यांच्या आर्थिक योगदानातुन सजावट झाली असल्याने शनिवार सोळा रोजी सकाळी मनाठा पोलिस स्टेशनचे सह्याय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमात उदघाटन करीत उपक्रमाचे कौतुक करीत योगदान देणाऱ्या व्यक्तीचा सन्मान केला.बरडशेवाळा पोलिस चौकी च्या माध्यमातून तरी आपले सहकार्य मिळाले
यावेळी बरडशेवाळा सरपंच प्रतीनिधी ज्ञानेश्वर मस्के, पळसा सरपंच शिल्पा रणजित कांबळे, उपसरपंच भाऊराव सुर्यवंशी, रमेश राठोड गारगव्हान, पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिंगाबर कदम मार्लेगाव , दत्तात्रय मस्के बरडशेवाळा, सुर्यवंशी तांलग , डॉ.आनेराव करमोडी, ,बिट जमादार मधुकर पवार, कानिस्टेबल आनंद वाघमारे, पत्रकार इस्माईल पिंजारी, हिमांशू इंगोले, मनाठा पोलिस स्टेशनचे देशमुख, नरवाडे,हटकर मडम,भुरके मडम, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजीव नाईक, भगवानराव मस्के, गणेशराव मस्के, आनंदराव मस्के, दिपक पाटील पळसेकर ,हालबोले , यशवंत सेनेचे तालुका अध्यक्ष गंगाधर मस्के, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अवधूत मस्के, बालाजी जमदाडे, सुभाष जमदाडे, यांच्या सह कार्यक्षेत्रातील आजी माजी सरपंच उपसरपंच पोलिस पाटील प्रतिष्ठीत नागरिक कार्यक्रते उपस्थित होते.सुत्रसंचलन शिक्षक चिल्लोरे यांनी केले.तर आभार आयोजक प्रभाकर दहीभाते यांनी केले.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!