झाड व झेंडा पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न.
झाड व झेंडा पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न
उमरखेड : कुठलाही लेखक ज्यावेळेस आत्मचरित्र लिहतो त्या मध्ये त्या समाजाचा इतिहास असल्याचे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ढाले पाटील यांनी केले तेआर्य वैश्य भवन येथे प्राचार्य डॉ . वि . ना . कदम लिखित ‘झाड आणि झेंडा ‘ हेत् यांचे आत्मकथन आज प्रकाशित झालेले आहेत त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थाना वरून बोलताना केले . तर डॉ .श्रीपाल सबनीस अध्यक्ष 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे यांच्या शुभहस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले . प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नामदेव ससाने ,डॉ . या . मा . राऊत , सचिव यवतमाळ जिल्हा अखिल भारतीय कुणबी समाज, डॉ .विजय माने ,कृषी शास्त्रज्ञ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला हे होते .तर या ग्रंथावर भाष्य डॉ . रामचंद्र काळुंखे व देविदास फुलारी यांनी केले .
अध्यक्षपदावून कौतिकराव ढाले पाटील म्हणाले , लेखणी चा उपयोग घेऊन लेखकांनी काळ घडवायचा असतो यालाच आत्मचरित्र म्हणतात उच्च प्रतीचे शिक्षण देण्याचे काम प्राचार्य डॉ .वि .ना कदम यांनी केला असून खेड्यापाड्यातील विस्थापित मुलांनी वाचावं असं आत्मचरित्र त्यांनी आपल्या कष्टातून त्रासातून अपमानातून संघर्ष मार्गाने लिहून एक दिशादर्शक असं आत्मकथन लिहिलं याचा वाचन लहान वयाच्या मुलापासून ज्येष्ठ व्यक्तीने केल्यास खरोखरच त्यांच्या जीवनामध्ये बदल घडून येऊ शकतो .
दलिताचे आत्मचरित्र खूप वाचले व पण गरीबाचा आत्मकथन पहिल्यांदाच डॉ . कदम यांनी लिहिल्यामुळे हा महाग्रंथ आहे त्यामुळे कदम आत्मकथेचा नायक आहे हे आत्मचरित्र स्वतःचे नसून अनेकांचे चरित्र आहे असे प्रतिपादन डॉ . श्रीपाल सबनीस यांनी केले .
या वेळी परिसरातील साहित्यिक डॉ . प्र भा . काळे, डॉ अनिल काळबंडे , डॉ .प्रेम हनवते प्रा .तात्याराव सूर्यवंशी , सुधाकर लोमटे ,आनंद देशमुख ,दीपक देशमुख , रवींद्र चव्हाण ,भारत सूर्यवंशी ,सुरेश वाघ , शिवाजी माने यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ..सूत्रसंचालन सुनील वानखेडे, विनय चव्हाण, वसुंधरा शिंदे यांनी केले तर आभार डॉ . वीरेंद्र कदम यांनी मानले . (सोबत फोटो )