काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाची मालिका सुरूच पुन्हा काँग्रेस पक्षात 256 तरुणांचा प्रवेश

youtube

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाची मालिका सुरूच

पुन्हा काँग्रेस पक्षात 256 तरुणांचा प्रवेश

उमरखेड :
विधानसभा क्षेत्रात सध्या युवकांची इनकमिंग जोरात सुरू असून, काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरण, विचार व नेतृत्वावर विश्वास ठेवत, उमरखेड तालुक्यातील निंगनूर, इसापूर,अमडापूर, पिरंजी, सोईट, तर महागाव तालुक्यातील दगडथर, पिपंरी, पिपंळगाव, अशा अनेक गावातील शेकडो तरुणांनी आज 27 सप्टेंबर रोजी , काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सोहळा शहर काँग्रेस येथे पार पडला. त्यामुळे काँग्रेस पक्षाची ताकत विधान सभेत सतत वाढतांना दिसत आहे.

काल विधानसभेतील महागाव क्षेत्रातील काही तरुणांचा पक्षप्रवेश आटोपताच आज पुन्हा तालुक्यातील जवळपास 256 तरुणांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सध्या उमरखेड विधानसभा मतदारसंघातील तरुण वर्ग हा काँग्रेस पक्षाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसत आहे. दिवसेंदिवस शेकडो तरुण काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आहेत. चालू महिन्याभरामध्ये जवळपास 700 ते 800 तरुणांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला उभारी मिळत आहे.

मागील एका दशका पासून उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात आहे. पहिले हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण हा बालेकिल्ला मागील एका दशकापासून भाजपाने काबीज केला असून उमरखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील दहा वर्षापासून भाजपा सत्तेत आहे.

महागाव आणि उमरखेड तालुक्यात एमआयडीसी नुसती नावापुरतीच आहे. यामध्ये कोणतेही मोठे उद्योग नाहीत. मागील दहा वर्षात भाजपाचे तात्कालीन आमदार आणि विद्यमान आमदार यांनी उमरखेड आणि महागाव तालुक्यात मोठे उद्योग आणण्याकरिता कोणतेही पाऊल उचलले नाही. 2014 ते 2019 मध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघांत तरुण वर्गाने पसंती देत भाजपाला सत्ता काबीज करून दिली होती.

विधानसभेतील तरुणांनी इतर पक्षावरील विश्वास कमी करून, तरुण वर्गाने पुन्हा काँग्रेसची वाट धरली आहे. आता विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असून उमरखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये तरुण वर्गाची काँग्रेस पक्षात होणाऱ्या इन्कमिंग मुळे भाजपाची धागधुक चांगलीच वाढली आहे. यामुळे काँग्रेसचे नेते तातूभाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर दतरावजी शिंदे आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे किंगमेकर गोपाल भाऊ अग्रवाल त्यांची ताकद वाढली आहे असेच म्हणावे लागेल.

या पक्ष सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तातूजी देशमुख,गोपाल भाऊ अग्रवाल,दत्तराव शिंदे, प्रेमराव वानखेडे, दादाराव गव्हाळे किशोर भवरे, राजू मुडे,बिरजू मुडे, राहुल वानखेडे, हमीद भाई कुरेशी तसेच उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे सह कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पण मागील दहा वर्षापासून भाजपाचे तात्कालीन आमदार आणि विद्यमान आमदार हे उमरखेड विधानसभा मतदारसंघातील समस्या सोडविण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. उमरखेड मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा टक्का दिसून येतो तरुणांच्या हाताला काम नाही.

Google Ad
Google Ad

7 thoughts on “काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाची मालिका सुरूच पुन्हा काँग्रेस पक्षात 256 तरुणांचा प्रवेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!